Nandurbar News : शेतकऱ्यांकडून कृषक मातेला साकडे ; शाकंभरी माता यात्रोत्सव

Mandane (St. Shahada): Farmers buying agricultural implements during the Shree Ashtabhuja Shakambhari Yatra of farmers going on here
Mandane (St. Shahada): Farmers buying agricultural implements during the Shree Ashtabhuja Shakambhari Yatra of farmers going on hereesakal

मंदाणे : येथील कृषकांची दैवत श्री शाकंभरी अष्टभुजा मातेच्या यात्रेत खानदेशसह मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांतील हजारो शेतकरी हजेरी लाऊन शेती उपयोगी वस्तू खरेदी करीत आहेत.

शेती पिकांच्या भावात मंदीचे सावट असले तरी आपल्या कुलदेवतेला नवस करून मंदी दूर करून पुढील हंगामात चांगला पाऊस पडावा यासाठी देवीला साकडे घातले जात आहेत. (Shakambhari Mata Yatrotsav purchase of agricultural materials Nandurbar News)

Mandane (St. Shahada): Farmers buying agricultural implements during the Shree Ashtabhuja Shakambhari Yatra of farmers going on here
Jalgaon News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात गर्भवती महिलेस जीवदान

मंदाणे (ता. शहादा) येथे कृषकांची दैवत म्हणून खानदेशासह इतर राज्यातही प्रसिद्ध असलेल्या श्री शाकंभरी अष्टभुजा मातेच्या यात्रेला नुकतीच सुरवात झाली. कुलदैवतेला नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने रोज भाविक येत आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचे सावट आहे. येणारा हंगाम चांगल्या प्रतीचा होवो यासाठी बळिराजा येथे आवर्जून आपल्या कुलदैवतेचे दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येत आहेत. तसेच शेती औजार खरेदी करण्यावर भर देत आहेत.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Mandane (St. Shahada): Farmers buying agricultural implements during the Shree Ashtabhuja Shakambhari Yatra of farmers going on here
Nashik News : लेखा विभागाचे हात दाखवून अवलक्षण

शेतीउपयोगी अवजारांची खरेदी

शेतकऱ्यांची यात्रा म्हणून नावलौकिक असलेल्या या यात्रेत व्यावसायिकांकडून दरवर्षी शेतीउपयोगी अवजारांची विक्री केली जाते. यात्रेत येणाऱ्या भाविकांकडून तसेच, विशेष करून शेतकऱ्यांकडून संसारोपयोगी वस्तूंसह शेतीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.

शेती उद्योगात जरी यांत्रिकीकरणाने प्रवेश केला असला तरी इतर काही शेती कामांना आजही शेती उपयोगी वस्तू बळिराजाला घ्याव्याच लागतात. अशीच काही शेतीला लागणारी महत्त्वाची औजार विक्रीसाठी मंदाणे यात्रेत दरवर्षी व्यापारी शेतकऱ्यांसाठी आणत असल्याने त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते.

Mandane (St. Shahada): Farmers buying agricultural implements during the Shree Ashtabhuja Shakambhari Yatra of farmers going on here
Nashik News : चंदनपुरी यात्रेत ढोलकीची जादू ओसरली; Electronic खेळणीच्या मागणीने विक्रीवर परिणाम

शेतकऱ्यांची गर्दी

औजार खरेदी करण्यासाठी मंदाणे यात्रेची वाट बघत असतो. शेतीउपयोगी सर्वच वस्तू मंदाणे यात्रेत उपलब्ध होत असल्याने बळिराजा लागणारी औजार खरेदी करतो. अशीच औजार खानदेशातील शेतकऱ्यांसह मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील शेतकऱ्यांकडून मंदाणे येथील शेतीउपयोगी अवजारे खरेदी केली जात आहेत.

त्यात लोखंडी बैलगाडी, लोखंडी औत वखरी, सुती भोईर, सुती दोर, विळा, खुरपे, फावडे, वखरी पास, कोयते, पावडी, टिकाव, पराळ, प्लास्टिक ड्रम, टप, दुधाचे कॅन आदी शेतीउपयोगी अवजारांचा समावेश आहे. शिरपूर, शिंदखेडा, खेड, कुसुंबा, नागेश्वर बंगला, सोनगीर, खेतिया, पानसेमल आदी गावांमधून विक्रेते दाखल झाले आहे.

Mandane (St. Shahada): Farmers buying agricultural implements during the Shree Ashtabhuja Shakambhari Yatra of farmers going on here
Nashik News : नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेची फसवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com