Shardiya Navratri
sakal
धुळे: शारदीय नवरात्रोत्सवास घटस्थापनेने सोमवार (ता.२२) पासून प्रारंभ होत आहे. शहरासह जिल्ह्यातील मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने तयारी पूर्ण झाली आहे. तसेच, घरोघरी भक्तिभावाने घटस्थापना होईल. शहरातील बाजारपेठेत फुलबाजार आणि पूजेचे साहित्य खरेदीसाठी भाविकांची दुकाने, स्टॉल्सवर लगबग दिसून आली.