कापडणे : जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आई-वडिलांसह आजी-आजोबांची प्रेरणा या चतुःसुत्रीच्या जोरावर शर्मिष्ठा कमलाकर अहिरे यांनी "एमपीएससी'तील स्थापत्य अभियांत्रिकी शाखा परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक मिळविला. शर्मिष्ठा यांची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती होईल. सलग दुसऱ्या परीक्षेत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी यश त्यांनी मिळविले. राज्यातील चाळीस हजार परीक्षार्थींमधून ही भरारी घेतली.

आनंदखेडे येथील शर्मिष्ठा अहिरे यांचे प्राथमिक शिक्षण कस्तुरबा गांधी विद्यालयात झाले आहे. पाचवीत जवाहर नवोदय परीक्षेत गुणवत्तायादीत चमकली. अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. तिथेही गुणवत्तायादीत स्थान मिळविले. धुळे शहरातील शासकीय अभियांत्रिकी विद्यालयात पदविका संपादित केली. त्यानंतर लोणेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या महाविद्यालयात बी.टेक पदवी मिळविली. त्यानंतर पुणे येथील कर्वेनगरमधील एका अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. स्वयंअध्ययनातून अहिरे यांनी मोठे यश संपादित केले.
"एमपीएससी'ने फेब्रुवारी 2019 मध्ये कनिष्ठ अभियंतापदाचा निकाल घोषित केला. या पीडब्ल्यूडीच्या परीक्षेत अहिरे यांनी मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. नगर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. आता 24 नोव्हेंबरला "एमपीएससी'ची मुख्य परीक्षा देत आहे.
कमलाकर आणि राजश्री अहिरे म्हणाले, की आम्हाला दोन मुली आहेत. मुलांसम शिक्षण सुरू आहे. कोणताही भेदभाव नाही. आमच्या मेहनतीचे मुली सोने करीत आहेत. अभ्यास आणि अभ्यास हेच ध्येय त्यांनी बाळगल्याचा आम्हाला अभिमान आहे. ग्रामीण भागातूनच प्राथमिक शिक्षण घेऊन मोठे यश संपादित करीत आहेत.
मेहनत, जिद्द, अभ्यास एके अभ्यास आणि आई-वडील, आजी-आजोबांची प्रेरणेतून हे यश मिळाले. क्लास वन अधिकारी होण्याचे ध्येय आहे. यासाठी अभ्यास अविरत सुरू आहे. सध्या नगर येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. सेवेचा वेळवगळता निरंतर अभ्यास करणे अन् ध्येय गाठणे. हेच ध्येय आहे.
- शर्मिष्ठा अहिरे, आनंदखेडे, ता. धुळे