टोमॅटोच्या उभ्या पिकात सोडल्या मेंढ्या (व्हिडीओ)

रोशन भामरे
शुक्रवार, 18 मे 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : गेल्या तीन ते चार महिन्यापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, उत्पन्न खर्चही निघत नसल्यामुळे तळवाडे दिगरसह परिसरातील नागरिकांना आत्ता शेतात मेंढ्या सोडल्या आहेत. तर टोमॅटो बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडीभाडे सुद्धा खिशातून भरण्याची वेळ टोमॅटो  उत्पादक शेतकऱ्यांवर आली असून उन्हातान्हात काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्रीसाठी नेल्यावर आपल्यालाच खिशातून भाडे भरावे लागत आहे.

तळवाडे दिगर (नाशिक) : गेल्या तीन ते चार महिन्यापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, उत्पन्न खर्चही निघत नसल्यामुळे तळवाडे दिगरसह परिसरातील नागरिकांना आत्ता शेतात मेंढ्या सोडल्या आहेत. तर टोमॅटो बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडीभाडे सुद्धा खिशातून भरण्याची वेळ टोमॅटो  उत्पादक शेतकऱ्यांवर आली असून उन्हातान्हात काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्रीसाठी नेल्यावर आपल्यालाच खिशातून भाडे भरावे लागत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून टोमॅटो आता 1 ते 2 रुपये किलो इतका घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला असून उभ्या पिकात जनावर सोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

गेल्या चार ते पाच महिन्यापासून टोमँटोचे हेच दर कायम असून, याला कंटाळून शेतकऱ्यांनी टोमँटोच्या शेतात मेंढ्या, शेळया, घोड़े, गाय, बैल सोडण्याची वेळ आली असून गावातून पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी ऐन उन्हाळयात हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या उभ्या पिकात जनावर सोडले असून, बळीराजा पुन्हा एका कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे.

टोमॅटो पिकासाठी एकरी एक लाख ते सव्वालाख रुपये खर्च करून हातात एक रुपया पण पडत नसून उलट घरातू पैसे घालण्याची वेळ उत्पादक शेतकरी वर्गावर आलेली आहे. टोमॅटोसाठी शेतीची मशागत, ठिबक, मल्चिंग पेपर, खत, औषध, मंडपासाठी तार, बांबू, सुतळी, बांधणी, तोडणी (काढणी) मजुरी आदी खर्चाचा विचार केला तर एकरी लाख रुपये खर्च करूनही हातात मात्र कोऱ्या पावत्या पडत असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

शेतकऱ्याचा माल शेतात तयार झाल्यावर सुध्दा तो व्यापारी वर्ग बाजारात आणण्यासाठी तोडणी, क्रेटभरणे, वाहतुक यासर्व बाबींचा खर्च शेतकऱ्यास करावा लागतो. त्यामुळे उत्पादनासाठी लागलेला खर्च व उत्पादनानंतर येणारा खर्च यांची गोळा बेरीज केली तर आजच्या भावात उत्पादक शेतकऱ्यास  टोमॅटो पीक न परवडत नसून पुढील महिन्यात बाजारभाव वाढतील अशा आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली असून दर महिन्याला बाजाभाव तोच असून ऐन उन्हळ्यात कवडीमोल दरात विक्रीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

“गेल्या तीन महिन्यात दोन टप्यात टोमॅटोची लागवड केली. एक नाही तर दुसऱ्या प्लॉटला चांगला दर मिळेल या आशेवर लागवड केली मात्र गेल्या चार महिन्यापासून टोमॅटो २ ते ३ रुपये अशा कवडीमोल दरामुळे खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या पिकात कालपासून मेंढ्या सोडल्या आहेत.”
-  दीपक आहिरे, युवा शेतकरी तळवाडे दिगर

Web Title: sheep kept into tomato farm