नस्तनपूर देवस्थानाच्या परिसरात पक्षांसाठी निवारा व अन्नपाण्याची सुविधा

nandgaon
nandgaon

नांदगाव - सध्या तालुक्यातील दुष्काळाची एकीकडे दाहकता वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर निसर्गात मुक्त विहार करणाऱ्या पक्षांसाठी  तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपूर येथील देवस्थानने आजपासून निवारा व अन्नपाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. नस्तनपूर येथील तीर्थस्थळाचा अलीकडे मोठ्या प्रमाणात कायापालट झाला आहे. त्यामुळे अलीकडच्या काही दिवसापासून धार्मिक पर्यटनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. परिसराला पर्यटनासाठी आलेल्या माणसांसोबत आकाशात विहार करणाऱ्या विविध पक्षांची गर्दी देखील वाढत आहे. अर्थात त्यासाठी निमित्त ठरले ते मंदिर परिसरातील भव्य असे नैसर्गिक उद्यान विकसित करण्यात आलेल्या या उद्यानात सध्या पाण्याची मुबलकता असल्याने गर्द हिरवाईने परिसर फुलून गेला आहे. 

बहरलेल्या फळाफुलांच्या हिरवीगार झाडांनी बहरलेले विस्तीर्ण असे उद्यान सध्या मंदिर परिसराला भेट देणाऱ्यांसाठी विरंगुळ्याची व आकर्षणाची जागा आहे. उद्यानाच्या या हिरवाईत काही क्षण घालविणाऱ्याना त्याची भुरळ पडतेच तशी ती निसर्गात मुक्तपणे विहार करणाऱ्या पक्षांसाठी हक्काची व सुरक्षतेची जागा ठरली आहे. सध्या सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे टँकरची मागणी वाढत आहे. अशा सर्व परिस्थितीत पक्षांसाठी दानपाण्याची सोया करण्यासाठी श्री क्षेत्र नस्तनपूरच्या देवस्थानाने उद्यानातील विविध झाडांवर लहान लहान भांडी दोरीलाबांधून पिण्याच्या पाण्यासोबत अन्नाची सुविधा उपलब्ध करून दिली. या सोयीमुळे आकाशात मुक्त विहार करणाऱ्या पक्षांचा किलबिलाटाने येथील उद्यान गजबजून गेले आहे देवस्थानचे मुख्य विश्वस्थ व माजी आमदार अॅड अनिल आहेर व त्यांच्या विश्वस्थ सहकाऱ्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com