शिंदी येथे ओंजळभर पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे

दीपक कच्छवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

मेहुणबारे - ओंजळभर पाण्यासाठी शिंदी (ता.चाळीसगाव) येथील ग्रामस्थांना किंमत मोजावी लागत आहे. गावातील पाण्याचे स्रोत आटल्याने गावाला पाणी टंचाईच्या झळा बसल्या आहेत. 

मेहुणबारे - ओंजळभर पाण्यासाठी शिंदी (ता.चाळीसगाव) येथील ग्रामस्थांना किंमत मोजावी लागत आहे. गावातील पाण्याचे स्रोत आटल्याने गावाला पाणी टंचाईच्या झळा बसल्या आहेत. 

शिंदी गावाची लोकसंख्या पाच हजाराच्या जवळपास आहे. गावात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात गेल्या दोन महीन्यापासुन नळाचे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आजुबाजुच्या शेतातून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीने जवळच असलेल्या मोरदरा धरणात पाणीपुरवठा योजना आहे. त्या ठिकाणावरून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर जलवाहिनी टाकुन पाणी आणले आहे. परंतु, मोरदरा धरणात पाणी नसल्याने गावातील नळानां पाणीच येत नसल्याने ग्रामस्थांसह महिलांना पाण्यासाठी परीसरात पायपीट करावी लागत आहे.

पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे
शिंदी गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची दोनशे लिटरच्या एका टाकीला पन्नास रूपये मोजावे लागत आहेत. पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावाला एका दिवसात खाजगी पाणी पुरवठा करणारे पाण्याचे दहा ट्रॅकर येतात. त्यामुळे शिंदी गावाला दिवसाला पंधरा ते वीस हजार रुपये नुसते पिण्याच्या पाण्यासाठी मोजावे लागत आहेत. ज्यांची घराची परीस्थिती चांगली आहे. ते पाणी विकत घेवु शकतात. रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्यांचे काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पाणी विकत घ्यावे की संसाराचा गाडा चालवावा असा प्रश्न महीलांनी उपस्थित केला आहे. पाण्यासाठी रात्रीचा दिवस उगवत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे.

गावातील पाच पाण्याचे 'आड' कोरडेठाक
येथील गावात पाण्याचे पाच आड (विहीर) आहेत. परंतु चार आड सध्यास्थितीत कोरडे पडले आहेत. काही ठिकाणी थोडे फार पाणी येते पण ते देखील पाणी काढुन वापरण्यासाठी उपयोग करतात. त्या आडांमध्ये मोठ्या प्रमाणावर घाण आहे. तरी देखील ते पाणी ग्रामस्थ वापरतात दहा डबे पाणी काढल्यावर एक हंडा भरतो. येथील पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी आशी मागणी यामुळे होत आहे. येथील गावातील नाना नवले यांनी आठ दिवसात एक दिवस मोफत पाणीपुरवठा करता. मात्र त्यांच्या शेतात मोसंबीची बाग जतन करावी लगत आहे. त्यांना कुणी टॅकर उपलब्ध करून दिले तर आजही आपण पाणीपुरवठा करू असे देखील त्यांनी सकाळशी बोलतांना सांगितले

चत्रभुज तांड्यावरही पाण्याचे हाल
शिंदी ग्रुप ग्रामपंचायतीचा एक भाग असलेल्या चत्रभुज  तांड्यावर पाण्यासाठी महिलांचे खुप हाल होत आहेत. आजुबाजुच्या विहिरीवर असलेले पाणी देखील  पिण्यायोग्य नाही. येथे जुना केटीवेअरमध्ये खाजगी छोटीशी विहीर खोदली आहे. येथे थोडेफार पाणी येते. हे पाणी दूषित असूनही ते भरण्यासाठी गर्दी होत असते. या गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आशी मागणी होत आहे.

पाण्यामुळे माझे पती अपंग झाले आहेत. गुरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीर पाणी काढतांना पाय निसटला व विहीरीत पडले. हे प्रशासन पाण्यामुळे कोणाचा जीव जाण्याची वाट बघत आहे की काय? आमचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा.
आशाबाई जाधव, ग्रामस्थ

माझी घराची परीस्थिती हलाखीची आहे.मी पाणी विकत घेवु शकत नाही.रोजंदारी करून कसेबसे कुटुंब चालवते.काम रोजच मिळेल असे नाही.त्यामुळे रात्री दोन वाजेपासून पाण्यासाठी फिरावे लागते तेव्हा दिवस उजाडेपर्यत पाणी आणुन कामाला जावे लागते.शासनाने आमची पाण्याची सोय करावी.
कमळाबाई पथवे, ग्रामस्थ

टँकर व्यावसायिकांची चांदी
येथील गावात पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. बाहेरून विहिरीवरून पाणी भरून आणत असलेल्या टँकर चालकांची शिंदी गावात अक्षरक्षा जत्रा भरत आहे. एका टँकरचे त्यांना अडीच ते तीन हजार रुपये मिळत आहेत. त्यामुळे दिवसाला एक पाण्याचा टँकर चार वेळा येतो. त्यामळे ट्रँकर व्यावसायिकांचीचांदिच होत आहे.

येथील गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ओढरे धरणावर परवानगी घेवुन एक 'शेवडी' देखील खोदण्यात आली होती. परंतु, तेथील ग्रामस्थांनी विरोध करत ती खोदलेली शेवडी बुजुवुन टाकली आमचा पाणीप्रश्न लवकर नाही सुटला तर सर्व गावातील महिलांसह ग्रामस्थ उपोषणाला बसतील.
गोरक राठोड सरपंच शिंदी( ता.चाळीसगाव)

Web Title: shindi has to pay money for water