हायड्रोक्लोराइड अॅसिडची हेराफेरी; शिंदखेडा पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दोन्ही टॅंकर ताब्यात घेतले असून, टॅंकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
crime news
crime newsesakal

चिमठाणे : मुंबई- आग्रा महामार्गावर बाभळे (ता.शिंदखेडा) फाट्याजवळ शुक्रवारी (ता.१७) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हॉटेल चामुंडाच्या शेजारी एका टॅंकरमधून इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने दुसऱ्या टॅंकरमध्ये हायड्रोक्लोराइड अॅसिड टाकताना शिंदखेडा पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दोन्ही टॅंकर ताब्यात घेतले असून, टॅंकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या हॉटेल चामुंडाच्या शेजारी हायड्रोक्लोराइड अॅसिडची हेराफेरी होत असल्याची माहिती निरिक्षक सुनील भाबड यांना मिळाली. त्यांनी चिमठाणे पोलिसांना याबाबत माहिती देत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. टँकर (जीजे ३८ टी ५६५३) मधून टॅंकर (एमएच ४० एके ४३९१) या टॅंकरमध्ये हायड्रोक्लोराइड अॅसिड कोणतीही काळजी न घेता पोलिसांना आढळून आले. झाकीर इब्राहीम खान(वय ५५, रा. गल्ली क्रमांक एक नई दिल्ली) असे चालकाचे नाव सांगितले. त्याच्याकडे टँकरमध्ये असलेल्या मालाबाबत चौकशी केली असता त्याने टॅकरमध्ये हायड्रोक्लोराइड अॅसिड असल्याचे सांगितले. चालकाकडे बील, कागदपत्रांची चौकशी केली असता हायड्रोक्लोराइड अॅसिड (जीजे ३८ टी ५६५३) मधील असल्याचे आढळून आले. शिंदखेडा पोलिसांनी कारवाई करत दोन्ही टॅकर शिंदखेडा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. निरिक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली, चिमठाणे दुरक्षेत्राचे पोलिस नाईक प्रशांत पवार, हवालदार रफिक मुल्ला, पोलिस कर्मचारी बडे, हर्षल चौधरी, ललित काळे आदींनी ही कारवाई केली. टॅंकर चालक झाकीर खान यास ताब्यात घेतले असून, पोलिस नाईक प्रशांत पवार यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक प्रशांत गोरावडे करीत आहेत.

crime news
Agneepath Yojana : बिहारमधील आंदोलनाने रेल्वेसेवा कोलमडली; अनेक गाड्या रद्द
crime news
शंकर महाराजांचे समकालीन भक्त ‘योग योगेश्‍वर जय शंकर’च्या सेटवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com