Shindkheda rain damage
sakal
चिमठाणे: शिंदखेडा तालुक्यात शनिवारी (ता. २७) दुपारी, रात्रभर आणि रविवारी (ता. २८) दिवसभर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मातीच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. तसेच, तालुक्यातील ६०० हेक्टरवरील पपई, केळी, कापूस व ऊस आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कंचनपूर येथे एका म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला. एकूणच परतीच्या पावसाने शिंदखेडा तालुकावासीयांना अशरश: रडकुंडीला आणले.