शिर्डी भक्तांसाठी रेल्वे तिकीटाबरोबरच दर्शनासाठीचे पासही बुक करण्याची सोय

saibaba
saibaba

मनमाड - शिर्डीला साई दर्शनासाठी जाणाऱ्या साई भक्तांसाठी नवीन वर्षात रेल्वेकडून खास भेट देण्यात आली. साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता रेल्वे तिकिटासोबत दर्शनपासही आरक्षित करता येणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. ही सुविधा फक्त मनमाड, नाशिक, साईनगर-शिर्डी, कोपरगाव, नगरसूल या स्टेशनचे रेल्वे तिकीट आरक्षित करणाऱ्या साईभक्तांसाठी उपलब्ध असणार आहे. अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारे साईबाबा संस्थान हे देशातील पहिले देवस्थान ठरले आहे. 

शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी देशभरातून दर वर्षी लाखोंच्या संख्येने भक्त येत असतात. मनमाड रेल्वे स्थानक अथवा साईनगर-शिर्डी, कोपरगाव, नगरसूल येथील रेल्वे स्थानकावर उतरून शिर्डीला जाता येते. मात्र शिर्डी येथे गेल्यानंतर साई दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे रहावे लागते. मात्र साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता रेल्वे तिकिटासोबत दर्शनपासही आरक्षित करता येणार आहे. भारतीय रेल्वेतर्फे साई बाबांच्या दर्शनाला शिर्डीत जाणाऱ्या भक्तांसाठी नवीन वर्षात भारतीय खास भेट देण्यात आली आहे. 

रेल्वेच्या या निर्णयामुळे देशभरातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या भक्तांना ही खास सुविधा मिळणार आहे . मात्र भक्तांना दर्शनासाठी तिकीट बुक करण्यासाठी ही सुविधा काही निवडक स्थानकांवरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये ही सुविधा फक्त मनमाड, नाशिक, साईनगर-शिर्डी, कोपरगाव, नगरसूल या स्टेशनचे रेल्वे तिकीट आरक्षित करणाऱ्या साईभक्तांसाठी उपलब्ध असणार आहे. या सुविधेमुळे भक्तांना मंदिर परिसरात दर्शनासाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. दर्शनासाठी ऑनलाईन तिकीटाची वैधता ट्रेन स्थानकांत पोहचल्यानंतर पुढील ४८ तासांपर्यंत असणार आहे. भाविकांना आयआरसीटीसीच्या वेबसाइट वरून रेल्वे तिकीट बुक करताना दर्शनाचे पासेस आरक्षित करता येतील. या सुविधांसाठी टाटा कन्सल्टन्सीने सॉफ्टवेअर विकसित केले आहे़. रेल्वे तिकिटाबरोबर दर्शन पासेससह संस्थानला ऑनलाइनच्या सर्व सुविधा विनामूल्य दिल्या आहेत़. त्यामुळे संस्थानची वर्षाकाठी मोठी बचत होणार आहे़.

या सुविधेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आला असून, भाविकांना लवकरच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारे साईबाबा संस्थान हे देशातील पहिले देवस्थान ठरले आहे. 

वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग रेल्वे प्रशासन करीत आहे. रेल्वे तिकीट आरक्षणामध्ये साई दर्शन पास उपलब्ध झाल्यास साई भक्तांची मोठी सोय होणार आहे. शिर्डी येथील दर्शनासाठी भाविकांना ताटकळत रहावे लागणार नाही यंदा साई बाबा समाधीचे शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे सर्व साई भक्त रेल्वे प्रवाश्याना ही स्मरणात राहिल अशी अनोखी भेट म्हणावी लागेल. 
- नितिन पांडे, सदस्य मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय समिती तथा भाजप नाशिक जिल्हा उपाध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com