शिरपूर: पेट्रोलिंग करताना पोलिस जीप उलटून झालेल्या अपघातात एक कर्मचारी ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. २) दुपारी एकला मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दहिवद (ता. शिरपूर)जवळ किसान हॉटेलसमोर घडला. मृत व जखमी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे कर्मचारी आहेत.