Shiv Sena demands for the announcement of drought at nandgaon
Shiv Sena demands for the announcement of drought at nandgaon

नांदगावमधील खरीपाची स्थिती चिंताजनक; शिवसेनेची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

नांदगाव - पावसाने दडी मारलेल्या पावसामुळे खरीप हंगामातली पिके अगोदरच उद्धवस्त झाली असल्याने सध्याची अवस्थाही पन्नास पैशांच्या आतील नजर आणेवारी असल्याने तालुक्यात दुष्काळ जाहीर करून टंचाई सदृश्यतेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी केली आहे. कांदे यांच्या नेतृत्वाखालील जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, विलासराव आहेर जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश बोरसे, पंचायत समितीच्या सभापती विद्यादेवी पाटील या शिवसेनेच्या नेते पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज तहसीलदार भारती सागरे यांची भेट घेत तालुक्यातील सध्यस्थितीबाबत त्यांना अवगत करणारे निवेदन सादर केले.

तालुकाप्रमुख किरण देवरे  शहरप्रमुख सुनील जाधव, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब हिरे, जिल्हा मजूर संघाचे उपाध्यक्ष प्रमोद भाबड, युवा सेनेचे शहरप्रमुख मनीष बागोरे अॅड. सचिन साळवे आदी यावेळी उपस्थित होते. निवेदनातील मजकूर असा मागील दीड ते दोन महिन्यांपासून तालुक्यात पावसाने सर्वत्र दडी मारल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके आता उद्धवस्त झालेली आहे. त्यामुळे सरकारने कृषीविभागामार्फत पिकांची पाहणी करून विनाविलंब पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ दुबार पेरणीसाठी मदत देण्यात यावी. पिकाची आणेवारी ५० पैशाचे आत लावण्यात यावी. व नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामधे सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत २५% टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडलेला असल्याने पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी देखील चारा व पाणी विकत आणावा लागत आहे. शासनाने सुरु केलेले पाणीपुरवठ्याचे शासकीय टॅकर सुरूच ठेवून यामध्ये जनावरांसाठी देखील स्वतंत्र टंकर उपलब्ध करून दयावे. दुष्काळी भागात तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्या. अस्मानी व सुलतानी संकटामुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडला असून तो आता आत्महत्येसारख्या वाईट प्रवृत्तीकडे चालला आहे. शासनाने याची वेळीच दखल घेतली नाही तर शेतकरी संपूर्ण उध्वस्त होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारकडून मदतीची गरज निर्माण झाली आहे. वरील सर्व मागण्या सरकारने तात्काळ मान्य करून शेतकऱ्यांना न्याय दयावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com