सट्टेबाजारात शिवसेना तेजीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नाशिक - गेल्या काही दिवसांपासून शहरात चर्चा आहे ती महापालिका निवडणुकीचीच. नाशिक महापालिकेवर कुणाची सत्ता येणार, हा नाशिककरांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरत आहे. शिवसेना हा अव्वल क्रमांकाचा पक्ष ठरेल, अशी चर्चा असताना सट्टेबाजाराचा कलही शिवसेनेकडे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा दर 1 रुपया 10 पैसे इतका असून, भारतीय जनता पक्षाचा दर 1 रुपया 80 पैसे इतका सुरू होता. 

उद्या (ता. 23) महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याने आज सट्टेबाजार तेजीत राहिला. दोन दिवसांपूर्वीपर्यंत भाजपचा दर तब्बल तीन रुपयांपर्यंत जाऊन पोचला होता. मात्र, निकालाचा दिवस जवळ येताच या दरात फरक पडला असून, सध्या एक रुपया 80 पैसे इतका दर निकालाच्या एक दिवसापूर्वी आज राहिला. दुसरीकडे शिवसेना पक्ष सट्टेबाजारात आधीपासूनच पसंतीचा राहिला. त्यामुळे एक रुपयाच्या जवळपास या पक्षासाठी दर होते. आज सायंकाळी साधारणत: एक रुपया ते एक रुपया 10 पैसे इतका दर शिवसेना पक्षावर लावला जात होता. 

क्रिकेटमुळे घट 
गेल्या काही कालावधीपासून क्रिकेट, त्यातही "आयपीएल'सारख्या क्रिकेट सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी केली जात आहे. नाशिकमधूनही क्रिकेट सामन्यांवर कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला जात आहे. त्यामुळे निवडणुकीवर सट्टा लावणाऱ्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे बोलले जात आहे. अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या एक्‍झीट पोलमुळेही डाव लावणाऱ्यांमध्ये घट झाल्याची चर्चा आहे. 

Web Title: Shiv Sena party's top ranks