भाजपने केले शिवस्मारकाचे राजकारण : पृथ्वीराज चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नाशिक : मुंबईतील अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा निर्णय राज्यातील आघाडी सरकारने 2004 मध्ये घेतला. त्यासाठी शंभर कोटींची तरतूद करण्यात आली होती. शिवस्मारकाला 15 फेब्रुवारी 2015मध्ये समुद्रकिनारा नियामक विभागाची परवानगी मिळाली होती. मग गेल्या वर्षभरात भूमीपूजनाच्या सोहळ्यासाठी मुहूर्त का मिळाला नाही, असा प्रश्‍न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवस्मारकाच्या भूमीपूजनाचे भारतीय जनता पक्षाने राजकारण केल्याचा आरोप केला. 

नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जाहिरातबाजी करत भाजपने खेळ केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा. याशिवाय भाजपने केलेले राजकारण खेदजनक आहे. 

दोन हजाराची नोट करा बंद 
काळापैसा, आतंकवाद, भ्रष्टाचार संपवण्यासाठी पाचशे-हजाराच्या नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. पण हे तीनही विषय फलद्रुप झालेला नसून चव्हाण यांनी दोन हजाराची नोट बंद करण्याची मागणी केली. त्याचवेळी उत्तरप्रदेश, पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये रोकड हाताळता यावी म्हणून दोन हजाराची नोट आणली. खरे म्हणजे, आम्ही दोन हजाराची नोट का आणली असे विचारल्यावर त्यास उत्तर मिळाले नाही. याशिवाय नव्या नोटा छापण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेला 20 हजार कोटींचा खर्च करावा लागणार आहे. त्यात 15 हजार कोटी परकीय चलनाचा समावेश असेल. त्यामुळे नोटाबंदी प्रकरणी संयुक्त संसद समितीची आम्ही मागणी केली आहे. आम्हाला नवीन नोटा छापण्यासाठी कागद, शाई, धागा पुरवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत? त्यांचे एजंट कोण आहेत? याचे उत्तर मिळायला हवे. आता प्लास्टिक नोटा आणण्याची भाषा केली जात आहे. पण प्लास्टिक नोटा छापणारी ऑस्ट्रेलियन कंपनी असून तिने जगभरात लाच दिल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गुप्तहेर संस्थांनी मान्यता दिलेली नाही. म्हणूनच प्लास्टिक नोटांचा अट्टाहास काय? त्याचे एजंट कोण आहेत? याची माहिती समजायला हवी. 

राहुल गांधींना द्या उत्तर 
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सहारा आणि बिर्ला कंपनीसंबंधीने आरोप केले आहेत. त्याबद्दल खिल्ली उडवण्याऐवजी पंतप्रधानांनी उत्तर द्यावे. या आरोपांविरुद्ध गप्प बसण्याचा नेमका अर्थ जनतेला समजल्याशिवाय राहणार नाही. तसेच चौकशी का थांबली याचे उत्तर मिळायला हवे, असे सांगत पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मेट्रोची सुरवात करत आहेत, असाही आरोप चव्हाण यांनी केला. कॉंग्रेस अंतर्गतच्या वादावर मात्र चव्हाण यांनी उत्तर देणे टाळले. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. 
 
Web Title: Shiva monument politics and BJP: Prithviraj Chavan