युतीतील वाद चव्हाट्यावर; नाशिकमध्ये शिवसेनेच्या 36 नगरसेवकांचे राजीनामे

Nashik
Nashik

नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या युतीतील पक्षांमधील धुसपूस नाशिकमध्ये समोर आली असून, भाजप विरोधात नाशिकमधील शिवसेनेतील 350 पदाधिकारी व 36 नगरसेवकांनी राजीनामा अस्त्र उपसले आहे.

नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे. नाशिक पश्चिमचा जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली असून त्यांच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि 36 नगरसेवकांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामे पाठविण्यात आले आहेत. भगवा फडकलाच पाहिजे, भाजपने ठरवून पश्चिममध्ये घुसखोरी, सर्वाधिक नगरसेवक, बालेकिल्ला बळकाविण्याचा कट, इतर ठिकाणी भाजपचा अपशकुन, विलास शिंदे निवडून येतील अशा आमचा विश्वास आहे. युती धर्म पाळण्यासाठी आपल्याला दुःख नको वाटायला म्हणून राजीनामे देत असल्याचे राजीनाम्यात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com