सेनेच्या पाच उमेदवारांना आमदार गोटेंचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

धुळे - शहरातील गुंडगिरी निपटून काढण्यासाठी सैतानच काय, तर विरोधक माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशीही युती करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी भूमिका जाहीर करणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज महापालिकेची येथील निवडणूक स्व- केंद्रित करण्याच्यादृष्टीने आणखी एक नवी खेळी केली. त्यांनी गुंडगिरीच्याच मुद्यावर शिवसेनेच्या पाच उमेदवारांना पाठिंबा जाहीर करत खळबळ उडवून दिली. 

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या लोकसंग्राम संघटनेने ज्या ठिकाणी उमेदवार दिले नाहीत, त्या पाच प्रभागांतील शिवसेनेचे उमेदवार आरास्तोलबाई भीमराव पारधी (प्रभाग ६- अ), प्रतिभा रामदास कानकाटे (९- ब), संजय नारायण गुजराथी (९- क), मनीषा योगेश चौधरी (११, क), हेमलता सुनील सोनवणे (१४, अ) यांना पाठिंबा देत असल्याचे आमदार गोटे यांनी सांगितले. ते म्हणाले, की महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून धुळे शहरातील गुंडगिरी मुळासकट उखडून टाकणे आणि मतांचे विभाजन टाळणे आवश्‍यक आहे. चांगले उमेदवार आपापसांत लढतात. त्यामुळे गुंड, बदमाश, बलात्कारी, स्त्रीलंपट, खंडणीखोर, चोर भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. अशा राक्षसी प्रवृत्तीचा पराभव करणे हेच परमेश्वरी कार्य होय. त्यामुळे धुळेकरांच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारत असून, ज्या ठिकाणी लोकसंग्राम संघटनेचे उमेदवार नाहीत. त्या ठिकाणी हिंदुत्वाचे, श्री राम मंदिर उभारणीची कास धरलेले हिंदूहृदयसम्राट (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचे पाणी करून उभारलेल्या शिवसेनेच्या पाच उमेदवारांना एकतर्फी जाहीर पाठिंबा देत आहे. आसुरी शक्तीचा पराभव हेच ध्येय मतदारांनी नजरेसमोर ठेवावे. लोकसंग्राम संघटनेची स्थापना आमदार गोटे यांनी केली असून, त्याचे नेतृत्व तेजस अनिल गोटे हे करीत आहेत.

शिवसेनेच्या पाच उमेदवारांना पाठिंबा देण्याचा आमदार गोटे यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यांचे शिवसेनेतर्फे अभिनंदन.  
- के. पी. नाईक, शिवसेना संपर्कप्रमुख

Web Title: Shivsena MLA Anil Gote Support Politics