महापौर निवडणुकीत शिवसेना तटस्थ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नाशिक - मुंबई, ठाणे येथे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला सरळ मदत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला नाशिकमध्ये शिवसेनेने तटस्थ राहून परतफेड केली आहे. आज भाजपकडून रंजना भानसी यांनी महापौरपदासाठी, तर प्रथमेश गिते यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तटस्थ भूमिकेमुळे काँग्रेसने महापौरपदासाठी, तर राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौरपदासाठी उमेदवार देत विरोधाची भूमिका घेतली आहे.

पुढील आठवड्यात महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. त्यासाठी आज अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी दोनपर्यंत मुदत होती.

भाजपतर्फे भानसी यांनी महापौरपदासाठी, तर गिते यांनी उपमहापौरपदासाठी नगरसचिव कार्यालयात शक्तिप्रदर्शन करीत अर्ज सादर केला. दुपारी बाराला भाजपचे सर्व नगरसेवक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हजर झाले. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, माजी आमदार वसंत गिते, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, सचिन ठाकरे, सुरेशबाबा पाटील, डॉ. बाळासाहेब आहेर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणी नायडू, डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. भानसी यांनी दोन अर्ज दाखल केले. दोन अर्जांवर सूचक म्हणून अनुक्रमे उद्धव निमसे व अरुण पवार; तर अनुमोदक म्हणून दिनकर आढाव व गणेश गिते यांच्या सह्या आहेत.

उपमहापौरपदासाठी गिते यांनी दोन अर्ज दाखल केले. पहिल्या अर्जावर सूचक म्हणून अर्चना थोरात व अनुमोदक म्हणून सुमन भालेराव; तर दुसऱ्या अर्जावर सूचक म्हणून चंद्रकांत खोडे व अनुमोदक म्हणून मुकेश शहाणे यांच्या सह्या आहेत. काँग्रेसतर्फे आशा मानकर-तडवी यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. सूचक म्हणून गटनेते शाहू खैरे व अनुमोदक म्हणून राहुल दिवे यांनी सह्या केल्या. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुषमा पगारे यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून ‘राष्ट्रवादी’चे गटनेते गजानन शेलार व अनुमोदक म्हणून वत्सला खैरे यांनी सह्या केल्या.
 
शिवसेनेची परतफेड
मुंबई व ठाणे महापालिकेत महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने भाजपने मतदान केले. त्याची परतफेड म्हणून शिवसेनेने नाशिकमध्ये तटस्थतेची भूमिका घेऊन महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा रस्ता मोकळा करून दिला. मुंबईत मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. नाशिकमध्येही मनसे तटस्थ राहिली आहे. १४ मार्चला प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य हजर राहतील की नाही, याबाबत साशंकता आहे.

Web Title: shivsena neutral in mayor election