नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना लढवणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक विधानपरिषदेच्या जागेवर शिवसनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे.

येवला - मी तुमच्यावर रागावलो पण याचा अर्थ असा नाही कि मी तुमच्यावर प्रेम करत नाही. नाशिकचा विजय हा शिवसेनेतीलसर्वांच्या एकजुटीचा विजय आहे. सर्वांचे अभिनंदन अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज टीम नाशिकचे कौतुक केले. नाशिक शिक्षक विधानपरिषदेची जागा शिवसेना लढवणार असल्याची घोषणा करत एकत्रित लढा..कामाला लागा असे आदेशही ठाकरे यांनी यावेळी दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक विधानपरिषदेच्या जागेवर शिवसनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे. या विजयानंतर नाशिकसह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी दराडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, योगेश घोलप, सुधाकर बडगुजर, विनायक पांडे,दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, सचिन मराठे, महेश बिडवे, सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, उदय सांगळे, येवल्यातील नेते संभाजी पवार, जिल्हा बँक संचालक किशोर दराडे, डॉ. सुधीर जाधव, दत्तात्रय वैद्य, वाल्मिक गोरे, कुणाल दराडे आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: shivsenas declared candidate for nashik teacher constituency election