नंदुरबारहून आजपासून मुंबईसाठी ‘शिवशाही’

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

नंदुरबार ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या येथील आगारातर्फे उद्यापासून (ता. १) रोज नाशिकमार्गे नंदुरबार- मुंबई शिवशाही आरामदायी बस सुरू होत आहे. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर नंदुरबार- पुणे मार्गावर सायंकाळी दोन स्लीपर अर्थात शयनयान बस सुरू करण्यात येत आहेत. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन धुळे येथील विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले आहे. 

बँकांच्या संपाने सामान्य मेटाकुटीस

गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती. दररोज सायंकाळी आठला नाशिकमार्गे नंदुरबार-मुंबई आरामदायी बससेवेस प्रारंभ होत आहे. यापूर्वी दररोज रात्री नऊला संगमनेरमार्गे नंदुरबार- पुणे शिवशाही स्लीपर बस सुरूच आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता रोज पुन्हा सायंकाळी सातला संगमनेरमार्गे नंदुरबार- पुणे शिवशाही स्लीपर बस सुरू करण्यात येत आहे. याशिवाय, नगरमार्गे जाणारी नंदुरबार- पुणे परिवर्तन बस रोज सायंकाळी पावणेआठलादेखील आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन नंदुरबार येथील आगारप्रमुख मनोज पवार यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivshahi for Nandurbar to Mumbai from today