हृदयदाता मिळण्यापूर्वीच श्‍लोक आंधळेचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

नाशिक - बालकांना हृदयदानासाठी सोशल मीडियावर सुरू असलेल्या अभियानाशी संबंधित श्‍लोक सुनील आंधळे या दीड वर्षाच्या मुलाचे याआधीच निधन झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्याला वाचविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, असे आंधळे परिवाराकडून सांगण्यात आले.

"सकाळ'मध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या "वुई द सोशल' या साप्ताहिक स्तंभामध्ये चिमुकल्या श्‍लोकसाठी आवश्‍यक असलेल्या हृदयाचा संदर्भ होता. तथापि, त्याच्या वयाला व वजनाला मिळत्याजुळत्या हृदयाचा दाता मिळण्यापूर्वीच गेल्या 16 मार्चला तो हे जग सोडून गेला. त्याच्या मोठ्या बहिणीचेही ती एक वर्षाची असताना हृदय निकामी होण्याच्या आजाराने निधन झाले होते, असा संदर्भही आंधळे कुटुंबाकडून देण्यात आला. आराध्या मुळे या चार वर्षांच्या मुलीला तरी हृदयदाता मिळावा, यासाठी गेले दोन दिवस ट्विटर व अन्य सोशल मीडियावर मोहीम सुरू आहे.

Web Title: shlok andhale dear