नेमबाज तनयला हवंय सरावासाठी पिस्तूल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

धुळे : विविध स्पर्धांमध्ये नेमबाजीतून धुळ्याचा नावलौकिक उंचावणारा आणि सुवर्णपदकांचा मानकरी ठरलेला येथील तनय गिरीश जोशी या खेळाडूला पिस्तूल खरेदीसाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्याची आर्थिक स्थितीत बेताची आहे. त्याला दानशूरांचे पाठबळ मिळाल्यास त्याची कामगिरी अधिक सरस होऊ शकेल. 

धुळे : विविध स्पर्धांमध्ये नेमबाजीतून धुळ्याचा नावलौकिक उंचावणारा आणि सुवर्णपदकांचा मानकरी ठरलेला येथील तनय गिरीश जोशी या खेळाडूला पिस्तूल खरेदीसाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्याची आर्थिक स्थितीत बेताची आहे. त्याला दानशूरांचे पाठबळ मिळाल्यास त्याची कामगिरी अधिक सरस होऊ शकेल. 

तनय जोशी हा येथील एकवीरादेवी विद्यालयाचा विद्यार्थी आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून म्हणजेच 2013 पासून तो दहा मीटर एअर पिस्टल या प्रकारात खेळत आहे. जिल्हा ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत त्याने भरारी घेत जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे. जिल्हास्तरावर झालेल्या पाच इंटरस्कूल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये सुवर्णपदक, विभागीय दोन स्पर्धांमध्ये रजत व कांस्यपदक, राज्यस्तरावरील विविध स्पर्धांमध्ये रजतपदक, राष्ट्रीय स्तरावर इंटरस्कूल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. शिवाय त्रिवेंद्रमसह विविध ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने पात्रता फेरी गाठली आहे. तसेच राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांसाठी तो पात्र ठरला आहे. 

दोन लाखांची गरज 
तनयकडे स्वतःचे पिस्तूल असले, तर तो अधिक सरस कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक सातासमुद्रापार नेऊ शकतो. त्याच्या करिअरला नवी दिशा मिळू शकते. त्याची कौटुंबिक स्थिती नाजूक असल्याने त्याला दानशूरांच्या आर्थिक पाठबळाची गरज आहे. तो सहा वर्षांपासून खासगी क्‍लबमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याला सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे त्याला पिस्तूल मिळाल्यास तो उत्तुंग भरारी घेऊ शकेल. त्याला पिस्तूल खरेदीसाठी दोन लाख रुपयांची गरज आहे. दानशूरांसह संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे. तनयला मदतीसाठी 9881090464 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आहे. 

Web Title: shooter Tanay wants pistol for practice