Dhule News : निरगुडी येथे शॉर्टसर्किटने आग; 3 झोपड्या जळून खाक

Short circuit fire Burn down 3 huts at nirgudi dhule news
Short circuit fire Burn down 3 huts at nirgudi dhule newsesakal

शिंदखेडा (जि. धुळे) : तालुक्यातील निरगुडी येथे बुधवारी (ता. १५) दुपारी आदिवासी वस्तीतील तीन झोपड्या शॉर्टसर्किटने (Short circuit) जळून खाक झाल्या.

या आगीत, प्रताप भिका भिल, आप्पा बन्सी भिल, छोटू मंगा भिल यांच्या झोपड्या जळून गेल्या. (Short circuit fire Burn down 3 huts at nirgudi dhule news)

तिन्ही कुटुंबांतील सदस्य मजुरी करणारे असल्याने शेतात गेलेले होते. घरातील साहित्य भांडे, कपडे, सायकल, कपाट, बाजरी, तांदूळ गहू, तसेच किराणा माल जळून खाक झाल्याने घरातील एकही पदार्थ आगीपासून वाचू शकला नाही.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

Short circuit fire Burn down 3 huts at nirgudi dhule news
Dhule News : 5 दिवसांपासून विहिरीत पडलेल्या श्वानाचे युवकांनी वाचविले प्राण!

घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती शिंदखेडा पोलिस ठाणे व तलाठी यांना देऊन अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

Short circuit fire Burn down 3 huts at nirgudi dhule news
ZP Nashik: प्रशासक राजवटीत शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोचण्याचे ध्येय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com