श्रीराम नवमीनिमित्त शहरातील मंदिरे सजली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

जळगाव - श्रीराम नवमीनिमित्त शहरातील विविध मंदिरे सजली असून, यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. प्रामुख्याने ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानमध्ये राम जन्मोत्सव सोहळा रंगणार असून काही ठिकाणी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. 

जळगाव - श्रीराम नवमीनिमित्त शहरातील विविध मंदिरे सजली असून, यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. प्रामुख्याने ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानमध्ये राम जन्मोत्सव सोहळा रंगणार असून काही ठिकाणी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. 

श्रीराम नवमी उद्या (ता. ४) साजरी होणार असून, शहरातील चिमुकले राममंदिर, श्रीराम मंदिर संस्थान यासह विविध मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे जुने जळगावातील श्रीराम मंदिरात पहाटे मंगलाभिषेक, मंगलारती होवून १० ते १२ यावेळेत कीर्तन होईल. दुपारी बाराला मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा होणार आहे. दुपारी चारला महिला मंडळाचे भजन, सायंकाळी सहाला पूजा-अर्चना, आरती होवून साडेसहाला शांतीपाठ, वेद मंत्र जागर होईल. रात्री नऊला संस्कार भारतीतर्फे गीतरामायणाचा कार्यक्रम होईल. 

चिमुकले राम मंदिरात अखंड जप
बस स्थानकासमोरील चिमुकले राममंदिरात आज दुपारी बारापासून अखंड रामनाम जप सुरू झाला असून, उद्या दुपारी बारापर्यंत सुरू असेल. पहाटे साडेपाचला काकडाआरती होईल. सहाला अभिषेक सातला आरती होईल. दुपारी दहा ते बारा यावेळेत दादा महाराज जोशी हे रामजन्माचे कीर्तन करतील. दुपारी बाराला जन्मसोहळा साजरा होईल. दिवसभर विविध कार्यक्रम झाल्यानंतर रात्री बाराला वेदघोष आणि अकरा रामरक्षेचे आवर्तन होवून जन्मोत्सव सोहळ्याची सांगता होईल.

संत गजानन महाराज मंदिरात पादुका पूजन
बांभोरी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात उद्या (ता.४) दिवसभर विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे. सकाळी सहा ते आठ या वेळेत श्री गजानन महाराज व श्रीरामांचे पुजन व पादुका पुजन तसेच अभिषेक होईल. आठला चैत्र नवरात्री नवमी होम, दहाला श्री गजानन महाराज महिला भगीनी मंडळ बांभोरी यांचे भजन होईल. ११ वाजून ४५ मिनीटापासून साडेबारा या वेळेत जयघोष श्रीराम नवमीनिमित्त शहरातील मंदिरे सजली व राम जन्मोत्सव (रामाचा पाळणा) साजरा होणार आहे. दुपारी साडेबाराला आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते महाआरती होईल. यानंतर तीन ते पाच या वेळेत सुंदरकांड होईल. सायंकाळी साडेपाचला हळदी कुंकू होवून सहाला एस. बी. चौधरी व रामराव पाटील यांच्याहस्ते आरती होईल.

जीवन कला मंदिर
जीवन कला मंदिराचा वर्धापन दिन व श्रीराम नवमी सोहळ्यानिमित्त ३ ते ५ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहे. उद्या (ता.४) सकाळी नऊला अभिषेक होईल. दुपारी चारला गणेश पुराण निरूपण होवून सायंकाळी सातला आरती होईल. बुधवारी (ता. ५) सकाळी नऊला अभिषेक होवून दहा ते बारा या वेळेत रामजन्माचे कीर्तन होईल. दुपारी बाराला आरती व प्रसाद वाटप होईल.

रामराज्य फाउंडेशनतर्फे कार्यक्रम
रामराज्य फाउंडेशनतर्फे हरिविठ्ठलनगर परिसरात श्रीराम जन्मोत्सवनिमित्त शिवतीर्थापासून निघणाऱ्या मुख्य शोभायात्रेत रामराज्य फाउंडेशन सहभागी होणार आहे. तसेच परिसरातील साई मंदिरात दुपारी बाराला महाप्रसादाचे वाटप होईल. दुपारी दोनला हरिविठ्ठलनगरातील हनुमान मंदिरात जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते पुजन होवून शोभयात्रेला सुरवात होईल.

Web Title: shriram navami celebration