Nandurbar : शेतजमीन, दागिन्यांसाठी बहिणीचा खून; निर्दयी भावाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandurbar Crime News

Nandurbar : शेतजमीन, दागिन्यांसाठी बहिणीचा खून; निर्दयी भावाला अटक

नंदुरबार : बहिणीची शेती (Farmland) व तिच्याकडे असलेले दागिने (jewelry) मिळविण्याच्या लोभापायी बहिणीलाच ठार मारून (Murder) तिचा मृतदेह नाल्याकाठी फेकणाऱ्या निर्दयी भावाचा शोध घेत एलसीबीच्या (LCB) पथकाने त्याला अटक केली आहे. त्याने बहिणीचा खून केल्याची कबुली देत, सारा घटनाक्रमच पोलिसांसमोर सांगितला. (Sisters murder for farmland jewelry Cruel brother arrested Nandurbar Crime News)

गेल्या १८ मेस सकाळी अकराच्या सुमारास निजामपुर (ता. नवापूर) शिवारातील कोरड्या नाल्यात दोरीने बांधलेल्या गोणपाटातून दुर्गंधी येत असल्याची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील व पथक घटनास्थळी दाखल झाले. तेथे त्यांना गोणपाटात कुजलेला मृतदेह, जांभळ्या व केशरी रंगाचे लुगडे व लाल ब्लाऊज दिसले. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, गुन्हे शोध पथक व संशयित पोसल्या नोगऱ्या वळवी हा देखील घटनास्थळी गेला. कपड्यांवरून मृतदेह आपली बहिण साकुबाई सुपड्या वळवी हिचा असल्याची ओळख त्याने पटविली. हा प्रकार घातपाताचा असल्याचे लक्षात येताच विसरवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, तपास सुरू असताना शुक्रवारी (ता. २०) पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २ ते ३ महिन्यांपूर्वी पोसल्या वळवी हा नंदुरबार येथे दागिने विकण्यासाठी गेला होता. त्यावर गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोसल्या यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार मृत साकुबाई ही पोसल्याची मोठी बहिण होती. तिला पती, मुल- बाळ नव्हते. पोसल्याची पत्नी सतत आजारी राहात असल्याने औषधोपचारासाठी त्याला पैशांची गरज भासत असे. त्यातच दोघा बहिण-भावात जमिनीच्या हिश्‍श्‍यावरून वाद सुरु होता. त्यातूनच पोसल्याने तीन महिन्यांपूर्वी साकुबाईला तिच्या घरात ठार मारुन गोणपाटात घालून घरी आणले. अंगावरील दागिने काढून नंदुरबार येथे सोनारास विकली. तसेच, काही दिवसांनंतर मृतदेहाचा जास्त वास येऊ लागताच ते गावालगत नाल्यात टाकून दिल्याची कबुली त्याने चौकशीत दिली.

हेही वाचा: पाकिस्तानला धूळ चारणारे ‘T-55’ रणगाडे भुसावळात स्थापन

निरीक्षक कळमकर, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल गोसावी, हवालदार प्रमोद सोनवणे, महेंद्र नगराळे, विनोद जाधव, राकेश वसावे, पोलिस नाईक दादाभाई मासूळ, बापू बागूल, जितेंद्र ठाकूर, जितेंद्र तोरवणे, जितेंद्र अहिरराव, सुनील पाडवी, पोलिस शिपाई आनंदा मराठे, राजेंद्र काटके, अभिमन्यू गावित, तुषार पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: Jalgaon : अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

हरविल्याची नोंद

दरम्यान, २३ फेब्रुवारीला पोसल्या यानेच आपली बहिण साकुबाई वळवी अचानक बेपत्ता झाल्याबाबत विसरवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्याने नातेवाईक व इतर ठिकाणी सर्वत्र शोध घेत असल्याचा बनाव केला होता.

Web Title: Sisters Murder For Farmland Jewelry Cruel Brother Arrested Nandurbar News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top