वाळू लिलावातून साठ लाखांचा निधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नाशिक - जिल्हा गौण खनिज विभागाने बुधवारी पाच वाळू ठिय्यांचे लिलाव पूर्ण करून साठ लाखांचा महसूल मिळविला. वाळू ठिय्यांचे लिलाव आज झाले. 25 टक्‍के दर कमी करून लिलाव करण्यात आले. त्यात कास (त्र्यंबक) येथील लिलाव 22 लाख 71 हजार रुपयांना, धांद्री (ता. बागलाण) येथील लिलाव 13 लाख 11 हजारांत, सावंतावाडी (मालेगाव) येथील लिलाव 16 लाख 81 हजाराला, वडनेर येथील ठिय्या पाच लाख 16 हजारांत, तर लखमापूर (ता. दिंडोरी) येथील लिलाव चार लाख 69 हजार रुपयांत झाला. एकूण 62 लाख 49 हजार 578 रुपये लिलावातून मिळाले. यापूर्वी चार लिलाव 40 लाखांना गेले होते. त्यामुळे केवळ दहा वाळू ठिय्ये लिलावातूनच एक कोटीचा महसूल मिळाला.
Web Title: six million funding in Sand auction