सोळा वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला

जयेश सुर्यवंशी
शुक्रवार, 30 मार्च 2018

आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दित 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला.

जेलरोड (नाशिक) - दसक गोदावरी नदीपात्रात आज सकाळी 10 च्या सुमारास आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दित 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला.
पोलिस कर्मचारी व अग्निशामक दल यांच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

सदर मुलीचे नाव प्रेरणा कुलदीप चव्हाण असे असून ही त्रिपती नगर, (खरर्जुल मळा) उपनगर येथे राहत असल्याचे मुलीच्या नातेवाकांनी सांगितले.  28 तारखेला उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दित मुलीची हरवली म्हणून तक्रार आहे. कारण अद्यापी समजले नाही. पुढील तपास उपनगर पोलिस स्टेशनकडे वर्ग केला आहे.

 

Web Title: Sixteen year old girl found dead in jailroad

टॅग्स