नाशिक जिल्ह्यात खरिपाच्या साठ टक्के पेरण्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

नाशिक - समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत तीन लाख 94,108 हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजे 60.39 टक्के पेरण्या झाल्या आहेत. खते आणि बी-बियाणे विक्रीलाही चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे.

संपूर्ण जून महिन्यात पाऊस गायब असल्याने खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरवातच झाली नव्हती. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी काळजीत होते. पण या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून समाधानकारकरीत्या हजेरी लावलेल्या पावसाने शेतकऱ्यांची काळजी दूर केली आहे. अठरा दिवसांत पेरण्यांचा आकडा साठ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. जवळपास सर्वच तालुक्‍यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने या कामाला वेग आला आहे. 12 जुलैपर्यंत 24 टक्के पेरण्या झाल्या होत्या. नऊ दिवसांत यात 36 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन पेरणीचा आकडा साठ टक्के झाला आहे. सर्वसाधारण क्षेत्र 6 लाख 52 हजार हेक्‍टर आहे. त्यावर भात, बाजरी, मका, सोयाबीन आदी पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. दरम्यानच्या काळात दुसरीकडे थंडावलेली रासायनिक खतांची विक्रीही जोर धरू लागली आहे. 62 हजार मेट्रिक टनांहून अधिक खतांची विक्री झाली आहे. पुढील काही दिवसांत विक्रीचा आकडा वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

Web Title: Sixty per cent of Nashik district kharif sowing