स्मार्टसिटी प्रकल्प कामांना आचारसंहितेचा अडथळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नाशिक - स्मार्टसिटींतर्गत शहरात नवीन प्रकल्पांना चालना देण्यासाठी महापालिकेने पावले उचलली असतानाच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आड आली आहे. कामे पूर्णत्वास नेण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने जिल्हा निवडणूक शाखेकडे, तर निवडणूक शाखेने आयोगाकडून मार्गदर्शन मागविले आहे. आयोगाने परवानगी नाकारल्यास मेअखेरपर्यंत काम तर होणार नाहीच. शिवाय शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लगेचच लागू होणार असून, जूनमध्येही कामांना मुहूर्त मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्मार्टसिटीअंतर्गत कंपनीच्या संचालक मंडळाने ३१५ कोटींच्या गावठाण विकास योजनेला मंजुरी दिली आहे. त्यात गावठाणातील रस्ते, चोवीस तास पाणीपुरवठा, मलवाहिका टाकणे यांसह माहिती तंत्रज्ञानावर आधारित आयसीटी प्रकल्पाच्या कामाच्या निविदा प्रसिद्धीला द्यायच्या आहेत. बहुमजली वाहनतळाच्या निविदाही प्रसिद्ध करण्याची तयारी झाली आहे. शहरात ४२ ठिकाणी स्मार्ट पार्किंग व पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यासाठी कार्यादेश देणे बाकी आहे. स्मार्टसिटीसाठी विविध आठ पदांची निवडप्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच आचारसंहिता लागू झाल्याने कामे रखडली आहेत. स्मार्टसिटी प्रकल्पांची अंमलबजावणी दोन वर्षांत करणे बंधनकारक असल्याने निविदा प्रसिद्धी, कार्यारंभ आदेश देण्यासाठी परवानगी मिळण्याची मागणी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी जिल्हा निवडणूक शाखेकडे केली होती; परंतु आचारसंहितेचा विषय निवडणूक आयोगाच्या अखत्यारित असल्याने जिल्हा निवडणूक शाखेने तसा पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागविले आहे.

Web Title: smart city project work code of conduct