काकस्पर्शाने कांद्याला कोटींची कमाई !

प्रशांत बैरागी, सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

नामपूर : पितृपक्षाच्या कालावधीत काकस्पर्शाने जिल्हयातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली आहे. यंदाच्या पितृपक्ष सप्ताहात कांद्याच्या विक्रीतून जिल्हयात सुमारे दोनशे कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल झाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहे. 

प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा 

नामपूर : आपल्या पूर्वजांच्या स्मृतीना उजाळा देणारा पितृपक्ष पंधरवडा घरोघरी होत असला तरी धार्मिकदृष्टया अशुभ काळ मानला जातो. त्यामुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे ग्रामीणपासून शहरी भागातील व्यावसायिक मंदीचा सार्वत्रिक अनुभव घेतात. अशा पितृपक्षाच्या कालावधीत काकस्पर्शाने जिल्हयातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली आहे. यंदाच्या पितृपक्ष सप्ताहात कांद्याच्या विक्रीतून जिल्हयात सुमारे दोनशे कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल झाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहे. 

जिल्ह्यात मनसेची 15 जागा लढविण्याची तयारी 

गेल्या तीन वर्षापासून सातत्याने कांद्याच्या दरांनी झळ खाणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदाही विक्रमी उन्हाळ कांदा लागवड करून सुरुवातीला काही माल विकून सुमारे 60 टक्के माल चाळीमध्ये साठविला होता. मोठय़ा कष्टाने शेतक-यांनी कांद्याचे उत्तम प्रकारे उत्पादन घेतले आहे. यंदा सर्वत्र शेतकर्यांना कांद्याचे उत्पादन चांगले आले आहेत. कांदा लावणीपासून ते कांदा चाळीभरेपर्यंत मोठय़ा प्रमाणात खर्चाला शेतक:यांना सामारे जावे लागते. मात्र गेल्या तीन वर्षापासून कांद्याचे भाव उतरल्याने शेतक:यांना खर्च निघणे अवघड झाले होते. परंतु यंदा प्रथमच झालेल्या भाववाढीने शेतकरी सुखावला आहे. 

"पुत्रवियोगाने मातेचे निधन

जिल्हयातील बाजार समितीत कांदा विक्रीसाठी दररोज सरासरी 50 ते 55 हजार कविंटल कांदा विक्रीसाठी आणले जात आहे. परंतु, गेल्या चार पाच महिन्यात भावच नसल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावाने कांदा विकावा लागला आहे. भाविष्यात कांद्याला चांगले भाव मिळतील, या हेतूने अनेक शेतकरी कांदा चाळीत साठवुन ठेवला होता. शहरी भागातील नागरिकांनी कांदादर वाढीचा बाऊ करू नये, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंदाही कांद्याला भाव नसल्याने कांदा चाळीत ठेवण्याची वेळ आली आहे

मोसम खोऱ्यात शेतकर्‍यांनी उन्हाळ कांदा लागवडीसाठी एकरी 40 ते 45 हजार रुपयांपर्यंत खर्च केला. कांद्याचे उत्पादन पदरात पडेपर्यंत क्विंटलला सरासरी एक हजार 200 रुपये खर्च झाला. यंदाच्या रोगट हवामान, गारपीट, अवकाळी पाऊस, यामुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्याचे बाजारभाव बघता उत्पादन खर्चही भागणार नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. शासनाने तत्काळ उत्पादन खर्चावर आधारित बाजारभावाचे नियोजन करावे किंवा शेतकर्‍यांना नुकसानभरपाईपोटी उत्पादन खर्चाइतके अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया 
देशांतर्गत बाजारपेठेत कांदा संपुष्टात आल्याने कांद्याचे दर वधारले आहेत. डिसेंबर पर्यन्त लाल कांदा बाजारपेठेत येईल तोपर्यंत दर टिकून राहतील. दक्षिण भारतात झालेल्या पावसाने कांद्याच्या भावात वाढ आहे. देशात मागणी वाढल्याने केवळ बांग्लादेशात कांदा निर्यात सुरु आहे. शेतकऱ्यांनी टप्पाटप्पाने माल विक्रीस आणावा.
- सोहनलाल भंडारी, अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन 

कांद्याची मागणी व पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त झाल्याने कांदा वधारला आहे. कांदा हवामानावर आधारीत पीक असल्याने दुष्काळी परिस्थितीमुळे भविष्यात अजून कांद्याच्या दरात सुधारणा होईल. बाजारात मोठी मागणी असल्याने केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाचा फारसा परिणाम कांद्याच्या दरावर होणार नाही. 
- दिपक चव्हाण, शेतमाल बाजारभाव अभ्यासक
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smile on the face of onion farmers in Ancestral