सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या फोटोने उडविली सोयगावकरांची झोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

सोयगाव परिसरात ओम पुष्प बहरल्याचा फोटो व्हायरल झाला होता. दरम्यान बुधवारी अधिकमास आणि रमजान महिन्याचा दुहेरी योगास प्रारंभ होताच पहाटेच हि घटना कळल्यावर सोयगावसह तालुकावासियांना हि गोड बातमी सोशल मिडीयावर समजल्यावर अनेकांनी या फुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

जरंडी : सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे शहरवासीयांची बुधवारी चांगलीच झोप उडाली होती. सोशल मिडीयावर चक्क ओम पुष्पबहरल्याचा फोटो व्हायरल करण्यात आल्याने सोयगाव सह तालुक्यात या बहरलेल्या फुलांचा शोध घेण्याचे काम दिवसभर चालू होते. अथक शोधमोहिमेनंतर हा फोटो व्हायरल असल्याचा कळल्यावर शहरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला.

सोयगाव परिसरात ओम पुष्प बहरल्याचा फोटो व्हायरल झाला होता. दरम्यान बुधवारी अधिकमास आणि रमजान महिन्याचा दुहेरी योगास प्रारंभ होताच पहाटेच हि घटना कळल्यावर सोयगावसह तालुकावासियांना हि गोड बातमी सोशल मिडीयावर समजल्यावर अनेकांनी या फुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर मोबाइलवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर सायंकाळी हा फोटो व्हायरल असल्याचे कळल्यावर अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला. परंतु या ओम पुष्पाला पाहण्याची अनेकांची इच्छा अपूर्ण राहिली.तब्बल पन्नास वर्षानंतर ओम पुष्प बहरतात असे पूर्वजांचे म्हणणे आहे, काहींनी या ओम पुष्प बाबत ऐकलेही होते,ऐन अधिक मास प्रारंभ होताच पहिल्याच दिवशी ओम पुष्प बहरल्याचे कळल्यावर शोध घेण्याचा प्रयत्नही केला. परंतु या प्रयत्नात अनेकांचा अपेक्षाभंग झाला होता. सोयगाव भागात ओम पुष्प बहरतात असेही आख्यायिका आहे.

त्या आख्यायिकानुसार अनेकांनी या फुलांचा शोधही घेतला काहींनी या ओम पुष्प पाहण्याचा आनंद सोशल मिडीयावरच घेतला.नशीबवान व्यक्तींनाच डोळ्यांनी ओम पुष्प दिसते असेही पूर्वजांच्या आख्यायिकेत म्हटले जाते,त्यामुळे नशीबवान आहे का याची प्रचीती घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केले.

Web Title: social media photo viral

टॅग्स