ज्ञानवृद्धीसाठी वापरा ‘सोशल मीडिया’ - सोनाली शिंदे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

धुळे - सध्याच्या प्रगत युगात ‘सोशल मीडिया’चा वापर सर्वमान्य झाला आहे. ई-मेल, गुगल, फेसबुक, व्हॉट्‌सॲपच्या सकारात्मक वापराने बऱ्याच कठीण गोष्टी सहज शक्‍य होत आहेत. उपयोगी माहितीची देवाण-घेवाण केल्यास त्याची महिला सक्षमीकरणास मदत होईल. यामुळे सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता ज्ञानवृद्धीसाठी करावा, असे आवाहन मुंबईतील पत्रकार सोनाली शिंदे यांनी केले.

येथील एसएसव्हीपीएस संस्थेच्या शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात यंग फाउंडेशन व भारतीय स्त्री शक्तीतर्फे विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी व्याख्यानाचा कार्यक्रम झाला, त्यात शिंदे बोलत होत्या. प्रांताधिकारी गणेश मिसाळ, प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील, यंग फाउंडेशनचे संदीप देवरे, भारतीय स्त्री शक्तीच्या कल्पना भागवत, मेधा जोशी, डॉ. शैलेश देवरे, आनंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पत्रकार शिंदे यांनी सोशल मीडियाच्या गैरवापराचे दुष्परिणाम, संभाव्य गुन्हे, सायबर क्राइम, विद्यार्थिनी व पालकांना भोगावा लागणारा मनस्ताप आदी बाबींवर प्रकाशझोत टाकत दक्ष राहण्याचे आवाहन केले. प्रांताधिकारी मिसाळ यांनी सोशल मीडियाचा जनहितासाठी वापर कसा होऊ शकतो, ई गव्हर्नन्स, विविध शासकीय कामांसाठी लागणारी ऑनलाइन प्रक्रिया, दाखले, टेक्‍नोसॅव्ही असण्याचे फायदे व महत्त्व विशद केले. प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. डॉ. शैलेश देवरे यांनी आभार मानले. महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्यांनी संयोजन केले.

Web Title: social media use for knowledge