अहिंसेनेही स्वातंत्र्य मिळू शकते हे गाधींजींनी जगाला दाखविले 

Social solidarity meeting took place in Taloda
Social solidarity meeting took place in Taloda

तळोदा: सद्यस्थितीत देशातील सामाजिक समतोल ढासळला आहे त्यामुळे देशाला एकसंघ ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाची सर्व - धर्म समभाव ही विचारसरणी आणि पर्यायाने काँग्रेस पक्ष आवश्यक आहे. शांततेचा मार्गाने कुठलेही शस्त्र हातात न घेता अहिंसेनेही स्वातंत्र्य मिळू शकते हे संपूर्ण जगाला महात्मा गांधीजींनी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे यांनी केले. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेसतफे आज शहरातील आदिवासी सांस्कृतिक भवनात सामाजिक एकता संमेलन झाले. त्यावेळी श्री. पानगव्हाणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, उपसभापती लता वळवी, नगरसेवक संजय माळी, माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, माळी समाजाचे अध्यक्ष अरविंद मगरे, साकऱ्या पाडवी, तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, माजी नगरसेवक सतीवन पाडवी, शेख अकबर शेख हिदायत, पंचायत समिती सदस्य सोनी पाडवी, सुमन वळवी व चंदनकुमार पवार आदी उपस्थित होते.

राजाराम पानगव्हाणे पुढे म्हणाले की, राज्यामध्ये सत्तेचा वाटा काँग्रेसला मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाला बळ देण्यासाठी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. देशात व राज्यात स्वबळावर काँगेसचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत. काँग्रेसला राज्यात बावीस वर्षांनंतर के. सी. पाडवी यांच्या रुपाने आदिवासी विकास मंत्रीपद प्राप्त झाले आहे, पक्षवाढीस ते नक्कीच फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले. 

पक्षाचा गतवैभवासाठी प्रयत्न करा 

माजी मंत्री पद्माकर वळवी म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार व आचार सर्वांपर्यंत पोहचवावेत यांसाठी सामाजिक एकता संमेलन हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तळोदा हे सामाजिक एकतेचे आदर्श असे उदाहरण आहे. सत्तेचा समतोल साधण्यासाठी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी सीमा वळवी यांना अध्यक्षपदाची संधी दिली आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com