सौरऊर्जा वापरात शहरात वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

नाशिक - नैसर्गिक स्रोताचा वापर वाढविण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत सौरउर्जेचा वापर करणाऱ्या घटकांना घरपट्टीत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2006 पासून आतापर्यंत शहरात नऊ हजार 478 ग्राहकांकडून सौरउर्जेचा वापर होत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. चालू आर्थिक वर्षात सौरउर्जेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना पाच टक्‍क्‍यांनुसार साडेतीन लाख रुपयांहून अधिक सवलत दिली आहे. शहरात पूर्वी बंबांचा वापर होत असे. त्यासाठी कोळसा व लाकडांचा वापर होत होता. कालांतराने दोन्ही घटक महाग झाल्याने मागणी व पुरवठ्यात घट झाली.

नाशिक - नैसर्गिक स्रोताचा वापर वाढविण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत सौरउर्जेचा वापर करणाऱ्या घटकांना घरपट्टीत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2006 पासून आतापर्यंत शहरात नऊ हजार 478 ग्राहकांकडून सौरउर्जेचा वापर होत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. चालू आर्थिक वर्षात सौरउर्जेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना पाच टक्‍क्‍यांनुसार साडेतीन लाख रुपयांहून अधिक सवलत दिली आहे. शहरात पूर्वी बंबांचा वापर होत असे. त्यासाठी कोळसा व लाकडांचा वापर होत होता. कालांतराने दोन्ही घटक महाग झाल्याने मागणी व पुरवठ्यात घट झाली. त्यानंतर गॅस हीटरला मागणी वाढली. आतापर्यंत सातपूर विभागात 743, पश्‍चिम विभागात 959, पूर्व विभागात 1254, पंचवटी विभागात 2054, सिडको विभागात 2751, तर नाशिक रोड विभागात 1717 सौरउर्जैचा वापर करणारे ग्राहक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: solar energy use in the city