बुरझड येथील शेतकऱ्याने विहिरीतच घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

कर्जाला कंटाळून लोखंडी साखळीला दोर बांधत आत्महत्या

सोनगीर - बुरझड (ता. धुळे) येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उतरण्यासाठी केलेल्या लोखंडी साखळीला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रोहिदास हिलाल पाटील (रा. बुरझड) असे मृताचे नाव आहे. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा माजी अध्यक्ष असलेल्या रोहिदास पाटीलवर विकास सोसायटीचे कर्ज होते, अशी पोलिस ठाण्यात नोंद झाली. कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

रोहिदास पाटील आज सकाळी आठला शेतात गेले होते. त्यांचा शेताला लागूनच असलेल्या अविनाश पाटील यांचा शेतातील सालदाराची पत्नी रमाबाईने रोहिदासने गळफास लावल्याचे दिसले. तिने आरडाओरड करून ग्रामस्थांना बोलावले. ग्रामस्थांचा मदतीने रोहिदासला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने खासगी वाहनाने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी किरणकुमार निकवाडे यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, येथील पोलिस ठाण्यात सुनील नारायण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. तक्रारीत रोहिदास पाटील कर्जबाजारी असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर बॅंक, सेवा सोसायटी व खासगी कर्ज असल्याचे समजते. रोहिदास पाटील यांच्या मागे आई, पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात उद्या (ता. २४) सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार असून, त्यानंतर बुरझड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. हवालदार एस. डी. बांगर तपास करीत आहेत.

Web Title: songir news farmer suicide