गीतांच्या ‘श्रावणसरीं’ची जळगावकरांना आज मेजवानी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

जळगाव - ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे...’ या बालकवींच्या काव्यपंक्‍तींची श्रावण सुरू होताच आठवण येते. याच श्रावणसरींमध्ये चिंब होण्याचा योग जळगावकरांना येणार आहे. निमित्त आहे ‘सकाळ’ खानदेश आवृत्तीच्या बाराव्या वर्धापनदिनाचे...!

जळगाव - ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे...’ या बालकवींच्या काव्यपंक्‍तींची श्रावण सुरू होताच आठवण येते. याच श्रावणसरींमध्ये चिंब होण्याचा योग जळगावकरांना येणार आहे. निमित्त आहे ‘सकाळ’ खानदेश आवृत्तीच्या बाराव्या वर्धापनदिनाचे...!

निसर्ग बहरात असतो, तेव्हा श्रावण महिना सुरू झालेला असतो. धरित्रीचे रूप निसर्गसौंदर्याने बहरलेले असते. सध्या सर्वत्र पावसाची रिपरिप अन्‌ अधूनमधून मुसळधार कोसळतच आहे. आभाळ आभ्राच्छादितही होत आहे. श्रावणमासात सर्वत्र पाऊस होत असल्याने आनंद ओसंडून वाहत आहे. सर्वत्र प्रसन्नता, आल्हादकता जाणवत आहे. श्रावणसरींनी निसर्ग धुक्‍यात हरवतो आहे. ऊन-पावसाच्या लपंडावात झुलाही रंग आभाळी फेकतो आहे. गाभाऱ्यात ओमकाराचा सूर-ताल निनादतो आहे. मनामनांत भक्तिभाव जागतो आहे. ऊन-सावल्यांचा खेळ, तसेच अधूनमधून सरींचा शिडकावा, असेच काहीसे वातावरण खानदेशवासीय अनुभवत आहेत. या वातावरणात ‘मधुरांगण’तर्फे ‘सकाळ श्रावणसरी’ कार्यक्रमात जळगावकर भिजणार आहेत.

‘सकाळ’ खानदेश आवृत्तीचा गुरुवारी (११ ऑगस्ट) तपपूर्ती सोहळा होत आहे. यानिमित्ताने ‘मधुरांगण’तर्फे वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला उद्या (१० ऑगस्ट) ‘सकाळ श्रावणसरी’ हा बहारदार गीतांचा कार्यक्रम होणार आहे. ही संगीत मैफील कांताई सभागृहात सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत रंगणार आहे. ‘के. के. कॅन्स’ हे कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. औरंगाबाद येथील ‘सूरताल ग्रुप’चे जीवन कुळकर्णी आणि सहकारी कलावंत ‘श्रावणसरीं’मध्ये जळगावकरांना भिजविणार आहेत. अधिक माहितीसाठी ‘तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा व्यासपीठा’चे व्यवस्थापक अमोल भट (भ्रमणध्वनी- ९८९१७२८८७६) व सहाय्यक व्यवस्थापक (जाहिरात) मुनिरा तरवारी (९८८११५४२१८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘मधुरांगण’तर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Songs of 'sravanasari' jalagav this feast