Sonia Kabra
sakal
जळगाव: येथील उद्योजकाच्या कन्येने आफ्रिकेत सुरू केलेल्या ‘स्टार्टअप’ कंपनीने अल्पावधीत तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे यश मिळविले आहे. सोनिया काबरा या तरुणीच्या ‘बू पास’नामक कंपनीस थेट आंतरराष्ट्रीय मानांकित शेअर बाजार, अर्थात नॅसडॅक (Nasdaq)ने प्रदर्शित केले आहे. कंपनी अद्याप त्यात सूचीबद्ध नसली तरी त्या दिशेने कंपनीची वाटचाल सुरू झाली. अशा प्रकारचा सन्मान मिळविणारी सोनिया ही जळगावसह खानदेशातील पहिली तरुणी ठरली आहे.