सोयाबीनच्या "बंपर' उत्पादनाने हमीभावाची कसोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

नाशिक - हमीभावापेक्षा अधिक भाव मिळणाऱ्या सोयाबीनची यंदा देशभर मोठ्याप्रमाणात लागवड होणार आहे. कडधान्य आणि मक्‍याच्या भावातील मंदीमुळे शेतकरी सोयाबीनकडे वळाले आहेत. त्याच वेळी अमेरिकेच्या कृषी विभागाने जगात 35 कोटी टन इतक्‍या विक्रमी उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या "बंपर' उत्पादनाने सरकारच्या हमीभावाची कसोटी लागणार आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अंदाजानुसार अमेरिका आणि ब्राझीलमध्ये 24 कोटी टन, तर अर्जेंटिनामध्ये 5 कोटी 70 लाख टन सोयाबीनचे उत्पादन अपेक्षित आहे. शिवाय चीनने अमेरिकेच्या सोयाबीनवर 25 टक्के आयातकर लावला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत 9 वर्षांतील नीचांकी भावाने सोयाबीन विकले जात आहे.

देशामध्ये यंदा जानेवारीपासून आतापर्यंत सरासरी सोयाबीनला क्विंटलला साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हा भाव गेल्या वर्षीच्या 3 हजार 50 आणि यंदाच्या 3 हजार 399 रुपये क्विंटल या किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक आहे. पण, दिवाळीपासून नव्याने बाजारात येणाऱ्या सोयाबीनचे भाव काय राहतील, याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे.

तीन राज्यांत 90 टक्के उत्पादन
देशात एकूण उत्पादित होणाऱ्या सोयाबीनमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांचा 90 टक्के हिस्सा आहे. एकट्या मध्य प्रदेशात देशातील 50 टक्के उत्पादन होते. महाराष्ट्रात मध्य प्रदेश खालोखाल उत्पादन होते. गेल्या वर्षी अधिक उत्पादन आणि शिल्लक सोयाबीनमुळे भावात मंदी राहील, असा अंदाज बांधला गेला होता. पण, सरकारच्या अंदाजाचा ताळमेळ जुळला नाही. 83 लाख 50 हजार टन देशात उत्पादनाचा अंदाज असताना 13 लाख टन शिल्लक सोयाबीन होता.

त्यातील 12 लाख टन बियाण्यासाठी वापरण्यात आले. 2 लाख टन सोयाबीन बियाण्याची निर्यात झाली. सोयाबीन खाद्यासाठी 15 लाख टनाचा वापर झाला. त्यामुळे देशाची गरज असल्याइतका सोयाबीन उपलब्ध झाल्याने भाववाढ झाली. त्यातून यंत्रणांचा ताळमेळ जुळला नाही, हे स्पष्ट झाले. यंदा एक लाख टनापर्यंत सोयाबीन शिल्लक आहे. शिवाय नवीन सोयाबीन दिवाळीत बाजारात येईल.

Web Title: soybean production minimum support price