Caste Verification : जात पडताळणीच्या त्रुटी पूर्ततेसाठी विशेष मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Caste Certificate Verification

Caste Verification : जात पडताळणीच्या त्रुटी पूर्ततेसाठी विशेष मोहीम

नंदुरबार : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ज्या अर्जदारांनी शैक्षणिक, सेवा, निवडणुकीकरिता जात पडताळणीचे (Caste Verification) प्रस्ताव सादर केले आहेत; (Special drive to rectify caste verification loopholes nandurbar news)

परंतु ज्या अर्जदारांची प्रकरणे त्रुटीअभावी समितीकडे प्रलंबित आहेत अशा प्रलंबित अर्जदारांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्या प्राची वाजे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

ज्या मागासवर्गीय अर्जदारांचे (अनुसूचित जमाती वगळून) प्रस्ताव जात पडताळणीकडे प्रलंबित असतील अशा अर्जदारांनी त्रुटीची पूर्तता करून आपले प्रस्ताव २७ फेब्रुवारी सकाळी अकरापर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकाऱ्यांनी केले आहे.