नाशिक कला कट्टा : मला रंगातही सप्तसूर दिसतात...

कलाकारांचा कलेशी आणि वाचकांची विचारसंवाद
Artist Deepak Verma
Artist Deepak Vermaesakal

सामान्य गोष्टीतील असामान्य सौंदर्य शोधून ते चित्ररूपात साकारण्याची निसर्गदत्त देणगी फार कमी कलाकारांना लाभत असते. नाशिकमधील ज्येष्ठ आणि गुणी चित्रकार दीपक वर्मा हे अशाच भाग्यवान कलाकारांपैकी एक.

अनोख्या नजाकतीने परंपरा आणि प्रयोगात्मकता याचा अनोखा संगम कॅनव्हासवर जिवंत करणारे हे गुणी चित्रकार ‘सकाळ’च्या वाचकांसाठी कलासंवाद साधताना म्हणतात, ‘मला रंगातही सप्तसूर दिसतात, संगीतामधले ‘सारेगमपधनी’ हे सप्तसूर ‘तानापिहीनिपाजा’ या सप्तरंगांमधून दर्शन देतात, तेव्हा कळते की सगळे एकच असते.

वास्तविक संगीत आणि चित्र ही दोन्ही वेगवेगळी कलामाध्यमे, परंतु, सौंदर्यदृष्टी ही जर समन्वयवादी असेल तर भिन्न माध्यमांच्याही कलेची भाषा कशी जुळू लागते हा कलाविचार वर्मा यांच्याशी मुलाखत घेताना लक्षात आला.

- तृप्ती चावरे- तिजारे

(Nashik Kala Katta deepak verma interview by trupti tijare chavare nashik news)

Artist Deepak Verma
Election 2023 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबल्याने इच्छुकांची कोंडी, खर्चातही वाढ

थोर चित्रकार (स्व.) रवी परांजपे यांचा आदर्श गिरविणारा वर्माजींचा प्रत्येक स्ट्रोक काहीतरी सांगत असतो, गात असतो. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हे काही त्या व्यक्तीचे सौंदर्याचे लक्षण असू शकत नाही, परंतु वर्माजींनी रेखाटलेल्या सुरकुत्याही किती सुंदर असतात हे त्या चित्राच्या चेहऱ्यावरचा प्रकाश सांगत असतो.

सामान्य नजरेला जे सुंदर दिसणार नाही ते चित्रातून सुंदर भासणे हे त्या चित्रकाराच्या कलाकृतीचे खरे सौंदर्य-विधान असते. वर्माजींच्या चित्रकृतींमध्ये ही सौंदर्यविधाने जागोजागी बघायला मिळतात.

पांढऱ्या कागदाला अर्थ आणि अस्तित्व देणारी त्यांची चित्रे म्हणजे रेखासंवाद आणि रंगसंवाद यांचा अनोखा मेळ आहे. काळाराम मंदिराच्या काळ्या पाषाणावर पडलेले उगवतीचे आणि मावळतीचे रंगसौंदर्य वर्मा सरांच्या साध्या पेन्सिलीमधूनही जेव्हा जिवंत होते, तेव्हा त्या कृष्णधवल चित्रातही साक्षात सूर्यप्रकाश कागदावर अवतरला आहे असा भास होतो.

सूर्य मावळतो पण वर्माजींच्या मनातला सूर्य मात्र रेखाटनाचा स्थायीभाव होऊन रहातो, रंगाशिवाय शेडींग हाताळण्यासाठी कलासंवेदना अशी तरल असावी लागते.

Artist Deepak Verma
Sugarcane Juice : उन्हाळ्याची चाहूल लागताच रसवंतीगृहांमध्ये घुमतोय घुंगरांचा आवाज!

चित्राला उंची केव्हा प्राप्त होते ? चित्राची 'खोली' अचूक टिपणारी सर्वांगीण नजर असेल तर ! वर्माजींची नजर केवळ कल्पनारम्यच नाही तर ती सौंदर्यवादीही आहे, कारण रंगसंगतीच्याही पलिकडे जात, 'रंगछटा' हा त्यांच्या चित्रातील 'खोली'चा गाभा आहे.

त्यांच्या कलाकृतींचा आवाका, त्यांतील छायाप्रकाशाचे सूक्ष्म चिंतन, बारकाव्यांची गोळीबंद पेशकश हे सगळे तपशील अंतर्मुख करणारे आहेत. त्यांच्या व्यक्तीचित्रात चेहऱ्यावरचे भाव, डोळ्यांचा रोख, शरीराचा पीळ, वस्त्रांचे तजेलदार रंग, पोत, या तपशीलामुळे जिवंत ताजेपणा उतरतो.

उत्तम रेखांकन, चित्ररचनेतील वेगळेपण, वास्तवाशी संवाद, ठोस संकल्पना, प्रमाणबद्ध विचार आणि अभिव्यक्तीमधील स्पष्टता हा 'पंचरंगी गोफ' त्यांची चित्रकला मनात गुंफणारा आहे. चाकोरीबाह्य आणि नावीन्यपूर्ण कलाकृती निर्माण करीत असतानाही चित्रकलेच्या पारंपारिक आणि मूलभूत सौंदर्याला ते धक्का लागू देत नाही.

व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, भित्तीचित्र, रेखाचित्र, तैलचित्र, आकृतीचित्र, या सर्वच प्रकारांशी ते सहज संवाद साधतात. चित्र कोणतेही असो, त्यावर उमटणारा ठसा मात्र त्याचा स्वतःचा असतो.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Artist Deepak Verma
YIN Ministry : जिल्‍हाध्यक्षपदी वेदांत बच्‍छाव, कार्याध्यक्षपदी दर्शन देवरेची निवड

वर्माजींना अनेक ज्येष्ठ आणि थोर गुरुजनांचा सहवास लाभला आहे. चित्रकार गोपाळराव देऊसकर,रवी परांजपे, शरद कापूसकर, अशा थोरा मोठ्यांचे सान्निध्य भाग्याशी आले याचे ऋण डोळ्यासमोर ठेवून त्यांची साधना अविरत सुरू असते.

आजवर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, पण 'चित्रकृतीच्या कल्पनांच्या झाडावर सतत विहार करणे' याला ते खरा पुरस्कार मानतात. त्यांची विपुल अशी चित्रसंपदा पुढच्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शनाचा एक तेवत

दीपस्तंभ ठरणार आहे. कलापरंपरेचे अभ्यासक व साधक असलेल्या वर्माजींच्या चित्रकृती बघणे हा केवळ मनोरंजनाचा विषय नाही तर तो रसग्रहणाचा विषय आहे.

त्यांच्या चित्रकृती विलोभनीय आणि मनमोहक तर आहेतच परंतु, अभिजात चित्रकला शिकणारे कलेचे विद्यार्थी, कलाशिक्षक आणि रसिकांसाठी त्यांची चित्रे आदर्श व प्रेरणादायी आहेत. अशा कलासक्त चित्रकाराचे कलामंदिर आपल्या नाशिकमध्ये आहे हे आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी एक वरदान ठरेल यात शंका नाही

Artist Deepak Verma
Bhagyashree Banait : सरकारी वाहनाचे रीतसर पैसे भरणारच : भाग्यश्री बानाईत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com