Dhule Crime News : आयजींचा जुगारअड्ड्यावर छापा; 66 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Crime News
Crime Newsesakal

Dhule Crime News : बंद पडलेल्या पोल्ट्रीफार्ममध्ये चादरी टाकून झन्नामन्ना जुगाराचा डाव सुरू असताना नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकून ५४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

त्यापूर्वी पोलिसांना पाहून काहींनी चारचाकी गाड्या जागेवर सोडून पळ काढला. तब्बल ६६ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यात १३ लाख २९ हजारांच्या रोख रकमेचा समावेश आहे. (Special Inspector General of Police raid gambling den and seized 66 lakh worth of valuables dhule crime news)

सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळासनेर गावाजवळ जय माता दी ढाब्यामागे पत्र्याच्या शेडमध्ये जुगारअड्डा चालविला जात असल्याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांना माहिती मिळाली होती.

त्यांच्या आदेशानुसार नियुक्त विशेष पथकाने २१ जूनला रात्री छापा टाकला. डाव रंगलेला असताना पोलिसांची चाहूल लागल्याने जुगारी बिथरले. त्यांची एकच धावपळ उडाली. मात्र पोलिसांनी जुगारअड्ड्याची सर्वच दिशांनी नाकाबंदी केली. तथापि, अंधार व नाल्याचा आडोसा घेऊन पळण्यात काही जण यशस्वी ठरले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Nagpur Crime: पती, सासू, सासरे यांनी मारहाण करून विवाहितेची केली हत्या; गळफासाने मृत्यू झाल्याचा केला बनाव

घटनास्थळावरून पोलिसांनी जुगारअड्डा चालविणाऱ्या चौघांसह तब्बल ५४ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत १३ लाख २९ हजार रुपयांची रोकड, दोन लाख ५६ हजार रुपये किमतीचे ४६ मोबाईल फोन, दोन लाख रुपये किमतीच्या सहा दुचाकी, ४८ लाख ५० हजार रुपये किमतीच्या आठ चारचाकी गाड्या व १० हजार रुपये किमतीचे दोन गालिचे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

जुगारअड्डा चालविल्याच्या संशयावरून जागामालक सुभाष शिंदे, राघव शिरसाट, तर झन्नामन्ना जुगार खेळल्याच्या संशयावरून अन्य संशयितांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अटक केलेल्या जुगाऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील रहिवाशांचा भरणा आहे. मध्य प्रदेशातून पळासनेरला येऊन मोठ्या प्रमाणावर जुगार खेळविण्यात येत असल्याचा संशय आहे. महाराष्ट्रातून अमळनेर, पळासनेर व दोंडाईचा येथून तेथे जुगारासाठी गेलेल्यांनाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे पोलिस दलातही खळबळ माजली आहे

Crime News
Belgaum Crime : पतीनं पत्नीच्या डोक्यात दगड घालून केला खून; भांडणातून उचललं टोकाचं पाऊल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com