कळवण आगारास चैत्रोत्सव काळात मिळाले ४८ लाखांचे उत्पन्न 

दिगंबर पाटोळे
बुधवार, 11 एप्रिल 2018

वणी : देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रुंग गडावरील आदिमायेच्या चैत्रोत्सवात राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगाराने  ४७ लाख ८१ हजार २५८ रुपयांचा महसुल मिळवित भाविकांना सप्तश्रृंगीचे दर्शन घडविले.

चैत्रोत्सवात नांदुरी ते सप्तश्रृंगी गड रस्ता खाजगी वाहनांसाठी बंद करण्यात येत असल्याने एसटीच्या कळवण आगाराने २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान नांदुरी ते सप्तश्रृंगीगड दरम्यान ६०  जादा बसेसचे व्यवस्था केली होती.

या कालावधीत सरासरी ५० बसेसचा वापर करीत ५ हजार ८५ फेऱ्या करुन महामंडळाने १२ हजार १८६ लहान मुलासंह १ लाख ९१ हजार ४६९ भाविकांची वाहतूक केली. यातून कळवण आगारास ४७ लाख ८१ हजार २५८ रुपयांचा महसुल मिळवला  असल्याची माहिती आगार व्यवस्थापक अे. सी. अहिरे, लिपिक विजय दळवी यांनी दिली आहे.

अर्थात गेल्या वर्षाच्या तुलनेत ३९ हजार ४३० भाविक प्रवाशांची वाहतूक अधिक प्रमाणात केली असून त्यातून ११ लाख ३७ हजार ८०८ रुपये अधिक मिळाले आहे.  यंदा नांदूरी ते गडा दरम्यानच्या वाहतुकीसाठी एसटीला एक दिवस जास्त मिळाला आहे. चैत्रोत्सवात खांदेशातील भाविकांची  सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी सर्वाधिक गर्दी असते.

गडावर येणाऱ्या भाविकांमध्ये पदयात्रेकरुंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे तसेच खाजगी वाहानाने येणाऱ्या भाविकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात्रा कालावधीत काही भाविकांना पदयात्रेने येणे शक्य झाले नाही तर असे भाविक खाजगी वाहानाने नांदुरी पर्यंत येवून पायी रस्त्याने गडावर जातात येतात व खाजगी वाहनाने घरी परतात.

त्यामुळे गडावर यात्रोत्सव काळात सुमारे आठ ते नऊ लाख भाविकांनी हजेरी लावली असली तरी निम्यापेक्षा अधिक भाविक हे खाजगी वाहानांनी प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य परीवहन महामंडळाच्या प्रवाशी वाहातूकीवर काहीसा परिणाम दिसून येत असला तरी सर्वसामान्य भाविकांच्यादृष्टीने राज्यपरीवहन महामंडळ सोयीस्कर व सुखकर प्रवास घडवित आहे.

Web Title: ST received 48 Lakhs during aadimaya chaitra utsav

टॅग्स