स्थायी समितीच्या सभापतिपदी चौधरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

धुळे - येथील महापालिकेत स्थायी आणि महिला व बालकल्याण समितीच्या तीन पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज दाखल झाले. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापतिपदी कैलास चौधरी, महिला व बालकल्याण सभापतिपदी इंदूबाई वाघ, उपसभापतिपदी चंद्रकला जाधव यांनी निवड निश्‍चित झाली आहे. ती घोषित होण्याची औपचारिकता राहिली आहे.  

धुळे - येथील महापालिकेत स्थायी आणि महिला व बालकल्याण समितीच्या तीन पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज दाखल झाले. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापतिपदी कैलास चौधरी, महिला व बालकल्याण सभापतिपदी इंदूबाई वाघ, उपसभापतिपदी चंद्रकला जाधव यांनी निवड निश्‍चित झाली आहे. ती घोषित होण्याची औपचारिकता राहिली आहे.  

स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजप- शिवसेना युतीने उमेदवार दिला असला तरी त्यांची दावेदारी केवळ औपचारिकता ठरेल. स्थायी समिती सभापती, महिला- बालकल्याण समिती सभापती, उपसभापतिपदासाठी ११ जानेवारीपासून अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली. अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम मुदत होती. यात इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 

पाच जणांकडून अर्ज
स्थायी समिती सभापतिपदासाठी कैलास चौधरी (राष्ट्रवादी काँग्रेस, प्रभाग ८-ब) व बिरबालादेवी मंडोरे (भाजप, प्रभाग १४- अ) यांनी, तर महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी इंदूबाई वाघ (राष्ट्रवादी काँग्रेस, प्रभाग २०- ब) व उपसभापती पदासाठी चंद्रकला जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस, प्रभाग १८-ब) व प्रभावती चौधरी (अपक्ष, प्रभाग ११-अ) यांनी अर्ज खरेदी केले. या पाचपैकी श्रीमती चौधरी वगळता चारही उमेदवारांनी अर्ज दाखलेकेले.

तीन पदांसाठी चार अर्ज
कैलास चौधरी यांच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कमलेश देवरे सूचक, तर दीपक शेलार यांनी अनुमोदक, श्रीमती मंडोरे यांच्या अर्जावर शिवसेनेचे संजय गुजराथी सूचक तर ज्योत्स्ना पाटील अनुमोदक, श्रीमती वाघ यांच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना बोरसे सूचक, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्सारी अफजलुन्निसा फजलुर्रहमान अनुमोदक, श्रीमती जाधव यांच्या अर्जावर ‘शविआ’च्या माधुरी अजळकर सूचक, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्सारी हलिमाबानो महम्मद शाबान यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. सत्ताधारी गटाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना महापौर कल्पना महाले, माजी महापौर जयश्री अहिरराव, कल्पना बोरसे, चित्रा दुसाने, यमुनाबाई जाधव, मनोज मोरे, कमलेश देवरे, चंद्रकांत सोनार, दीपक शेलार, गुलाब माळी आदी उपस्थित होते. भाजपच्या श्रीमती मंडोरे यांचा अर्ज दाखल करताना प्रतिभा चौधरी, शिवसेनेचे गंगाधर माळी, सतीश महाले, संजय गुजराथी, चेतन मंडोरे, किरण देशमुख आदी उपस्थित होते.

सहा महिन्यांसाठी  ‘फिरता’ सभापती...
सत्ताधारी गटातर्फे स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी मायादेवी परदेशी, कैलास चौधरी दावेदार होते. प्रथम संधीसाठी परदेशी इच्छुक होत्या. मात्र, चौधरी यांना सभापतिपदाची प्रथम संधी दिली गेली. ते सहा महिन्यांनी पदाचा राजीनामा देतील आणि उर्वरित सहा महिन्यांसाठी परदेशी यांना संधी दिली जाईल. मात्र, नेत्यांच्या या निर्णयावरून परदेशी काहीशा नाराज झाल्या. त्यामुळे त्या अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित नव्हत्या.

Web Title: Standing Committee Chowdhury