Dhule News : संपू द्या ‘औषधे’; अद्याप ‘सप्टेंबर’ कुठे उजाडला! महापालिका, आरोग्य विभाग बाबूशाही थाटात

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

Dhule News : महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये साधारण महिना-दीड महिन्यापासून खोकल्यासह काही त्वचारोग व वेदनाशामक क्रीम आदी औषधसाठा संपलेला आहे. इतर औषधसाठाही साधारण महिनाभर पुरेल अशी शक्यता आहे. मात्र, धुळे महापालिका प्रशासन व आरोग्य विभाग अद्यापही बाबूशाही थाटात आहे.

नवीन वर्षासाठी औषधसाठा खरेदीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने लगेच औषधसाठा उपलब्ध होण्याची चिन्हे नाहीत.

त्यामुळे कमीत कमी १५ दिवस ते महिनाभर औषधांसाठी प्रतीक्षा करावी लागेल अशी शक्यता आहे. (stock of medicine has not been purchased for this year by dhule municipal corporation news)

महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये सर्वसामान्य गरीब कुटुंबातील रुग्ण जातात. महापालिकेच्या सर्वच दवाखान्यांमध्ये छोट्या-मोठ्या आरोग्याच्या तक्रारी घेऊन नागरिक जातात, त्यामुळे या दवाखान्यांत नेहमीच गर्दी पाहायला मिळते. विशेषतः वातावरणात बदल झाल्यानंतर उद्‍भवणाऱ्या सर्दी, खोकला, थंडी, ताप, व्हायरल इन्फेक्शन, त्वचारोग आदींच्या उपचारासाठी मोठी गर्दी असते.

शिवाय या तक्रारींवर महापालिकेच्या दवाखान्यातून मिळणारी औषधे गुणकारी असतात असा सर्वसाधारण समज असल्याने गोरगरिबांसह इतर काही नागरिकदेखील महापालिकेच्या दवाखान्यात जातात.

महापालिका दर वर्षी वर्षभरासाठी औषधसाठा खरेदी करते. यंदा अर्थात २०२३-२४ या वर्षासाठी मात्र अद्याप औषधसाठा खरेदी झालेला नाही. मध्यंतरीच्या काळात व्हायरल इन्फेक्शन व इतर कारणांनी रुग्णांची संख्या वाढली.

परिणामी महापालिकेच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर औषधसाठा खर्ची झाल्याचे अधिकारी म्हणतात. यामुळे सद्यःस्थितीत खोकला व त्वचारोग, वेदनाशामक क्रीमचा साठा संपलेला आहे. गेल्या साधारण महिना-दीड महिन्यापासून ही औषधे नसल्याने रुग्णांना ती उपलब्ध होत नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Dhule Drought News : पावसाच्या दडीने ग्रामीण बाजारात शुकशुकाट; मजुरांच्या हाती ना काम ना पैसा

इतर औषधसाठादेखील साधारण महिनाभर पुरेल एवढाच आहे. त्यामुळे औषधसाठा त्वरित उपलब्ध व्हावा, अशी मागणी पुढे आली. समाजवादी पक्षाने निदर्शने करून आयुक्तांना निवेदन देत त्वरित औषधसाठा उपलब्ध करण्याची मागणी केली.

वर्क ऑर्डरच बाकी

महापालिकेच्या दवाखान्यात काही औषधे पूर्णपणे संपली असली, तरी ती लगेच उपलब्ध होतील अशी स्थिती नाही. कारण नवीन आर्थिक वर्षासाठी प्राप्त निविदाधारकांना अद्याप महापालिकेकडून वर्क ऑर्डर देणेच बाकी आहे. चार निविदाधारांकडून ३ टक्के अनामत रक्कम जमा करणे व त्यानंतर वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

निविदाधारकांकडून अनामत रक्कम जमा करण्याबाबतची फाइल आयुक्तांकडे ठेवली आहे. आयुक्तांची बदली, नवीन आयुक्तांचा पदभार यामुळे या फायलीवर अद्याप आयुक्तांची स्वाक्षरी झालेली नाही.

ती झाल्यानंतर निविदाधारकांना वर्क ऑर्डर दिली जाईल व त्यानंतर औषधसाठा उपलब्ध होणार आहे. या प्रक्रियेला किमान पंधरा दिवस ते महिना लागण्याची शक्यता आहे. वर्षभरासाठी सुमारे ३५ ते ४० लाखांची औषध खरेदी होणार आहे.

Dhule Municipal Corporation
Dhule News : किचकट शस्त्रक्रियेनंतर दुभत्या म्हशीस जीवदान; 3 तासांच्या शस्त्रक्रियेत काढला सत्तर ग्रॅमचा दगड

एप्रिलपासून ते सप्टेंबर प्रक्रिया

नवीन वर्षात वर्षभराचा औषधसाठा खरेदी करण्याची प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होते. त्या-त्या दवाखान्यातील मागील तीन वर्षांच्या औषधसाठ्याचा लेखाजोखा व नवीन वर्षासाठी मागणी, अंदाजपत्रकात तरतूद असा सोपस्कार झाल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होते.

यात नंतर निविदाप्रक्रिया व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थायी समितीची मंजुरी, त्यानंतर निविदाधारकांकडून अनामत रक्कम जमा करणे व त्यानंतर त्यांना वर्क ऑर्डर दिली जाते. वर्क ऑर्डर दिल्यानंतर संबंधित कंपन्या महापालिकेला औषधसाठा पुरवतात.

दर वर्षी यासाठी सप्टेंबर उजाडतो. यंदाही तो अद्याप उजाडलेला नाही. त्यामुळे औषधसाठा संपला असला तरी प्रशासकीय कारभार प्रथेप्रमाणेच सुरू आहे.

Dhule Municipal Corporation
Dhule News : वाल्हवेत आढळली ‘खरुली’ची वेल; आयुर्वेदिक औषधी असल्याने अनन्यसाधारण महत्त्व

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com