Dhule Crime News : चोरीस गेलेल्या वाहनाचा पोलिसांच्या मदतीने छडा

शहरातील एका व्यक्तीने चोरीस गेलेल्या आपल्या वाहनाचा आझादनगर पोलिसांच्या मदतीने छडा लावला.
stolen vehicle was recovered with help of police dhule crime news
stolen vehicle was recovered with help of police dhule crime newsesakal
Updated on

धुळे : शहरातील एका व्यक्तीने चोरीस गेलेल्या आपल्या वाहनाचा आझादनगर पोलिसांच्या मदतीने छडा लावला. पोलिसांनी कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथून अर्धवट वाहन हस्तगत केले. या प्रकरणी संशयित वाहनचोर अबू बकर जाकिर शाह (रा. रमजानबाबानगर, धुळे) याला अटक केली. (stolen vehicle was recovered with help of police dhule crime news)

न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली. सुलतान शाह हुसेन शाह (रा. रमजानबाबानगर, धुळे) हे व्यवसायाने ड्रायव्हर आहेत.

६ जानेवारीला रात्री त्यांनी त्यांच्या मालकीची पिक-अप (एमएच १८, एसी ९९०९) ऐंशी फुटी रोडवरील आमदार निवासस्थानाजवळ लावली.

मध्यरात्री चोरट्याने हे वाहन चोरून नेले. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी सुलतान शाह यांनी ८ जानेवारीला पोलिसांत फिर्याद दिली.

stolen vehicle was recovered with help of police dhule crime news
Dhule Crime News : कत्तलीसाठी होणारी जनावरांची वाहतूक रोखली; साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

त्यांनी उस्मान शाह, वसीम शाह (चाळीसगाव) व कैसशेठ (कन्नड) यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू ठेवला. यादरम्यान वाहन चाळीसगावच्या गनी नामक व्यक्तीला विक्री झाल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर वाहन कन्नड येथे स्क्रॅपिंगसाठी गेल्याचे समजले. त्यानुसार शहरातील रफिक शाह यांनी आझादनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलिंद नवगिरे, शांतिलाल सोनवणे, एम. एन. पठाण यांना सोबत घेत कन्नड गाठले.

तिथे स्थानिक पोलिसांची मदत घेतली. तपासात कन्नडच्या एका फॅक्टरीजवळील जंगलात पिक-अप अर्धवट अवस्थेत फेकलेली आढळली. पोलिसांनी वाहनाचा अर्धा भाग पंचनामा करीत ताब्यात घेतला.

stolen vehicle was recovered with help of police dhule crime news
Dhule Crime News : माजी उपमहापौरांसह दोघींवर हल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com