अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

चाळीसगाव - दारुड्या बापाने व्यसनामुळे आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा घाट घातला. मात्र, मुलीच्या मावशीमुळे अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव उधळण्यात येऊन यातून मुलीची सुटका झाली आहे. मुलीला बारडोली (गुजरात) येथे राहणाऱ्या तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले आहे. 

याबाबत माहिती अशी, शहरातील वामननगरातील रहिवासी असलेल्या व्यक्‍तीने दारूच्या व्यसनामुळे आपल्या बायकोलाही सोडले. पती- पत्नींमध्ये नेहमीच वाद होत असल्याने ते दोघेही वेगवेगळे राहत होते. त्यांची नववीत शिकणारी 14 वर्षीय मुलगी ही वडील व आजीकडे राहत होती. बापाला दारूचे व्यसन असल्याने त्याने आपल्या 14 वर्षीय मुलीचा विवाह पैशांसाठी एका 35 वर्षीय तरुणाशी लावून देण्याचा घाट घातला. या विवाहाची माहिती मुलीने आपल्या उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथे राहणाऱ्या मावशीला सांगून हा विवाह आपल्या मर्जीविरोधात केला जात असल्याचेही सांगितले. मावशीने तत्काळ मुलीच्या आईला हा प्रकार कळविल्यानंतर मुलीच्या आईकडील नातेवाइकांनी थेट शहर पोलिस ठाणे गाठले व पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. मुलगी व तिचे नातेवाईक पोलिस ठाण्यात आल्याचे कळताच वराकडील लोकांचे धाबे दणाणले. हा विवाह कायद्याला धरून नसल्याचे सांगत तो रद्द केला. 

Web Title: Stop the marriage of a minor girl