खानदेशी मतदार केंद्रस्थानी ठेवून ठरणार रणनीती

विक्रांत मते
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

शिवसेनेची बाजू भक्कम, भाजपनेही सरसावल्या बाह्या

नाशिक - कामटवाडेपासून अंबड गावाच्या सीमेपर्यंत गेलेल्या प्रभाग २८ मध्ये शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. राजकीय व्यूहरचनेचा भाग म्हणून अन्य पक्षांतील इच्छुकांना यापूर्वीच शब्द देऊन ठेवल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. उमेदवारीचे वाटप करताना अन्यायाची भावना निर्माण झाल्यास त्याचा लाभ उठविण्याची तयारी भाजपने केली आहे. बहुतांशी खानदेश व कसमादे भागातील मतदार असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करून निवडणुकीचे आडाखे बांधले आहेत.

ॲड. तानाजी जायभावे, प्रतिभा पवार, बाळासाहेब पाटील, अंबड भागातून मंदाताई दातीर, दिलीप दातीर, सुवर्णा मटाले यांनी यापूर्वी या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. सद्यःस्थितीत डी. जी. सूर्यवंशी, दिलीप दातीर, दीपक दातीर, याज्ञिक शिंदे, सुवर्णा मटाले, शीतल भामरे, विद्या लगड, प्रतिभा पवार, बाळासाहेब पाटील, अशोक पवार, प्रशांत कोतकर, तुषार मटाले, बाबा कापडणीस, कांचन पाटील, राजेंद्र नानकर येथून इच्छुक आहेत.

शिवसेना भक्कम स्थितीत
प्रभाग २८ मध्ये पूर्वीपासूनच शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने बाह्या सरसावल्या आहेत. तिकीट वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित होत नसल्याने सध्या दोन्ही पक्षांचे घोडे अडले आहे. शिवसेनेकडून दीपक दातीर व दिलीप दातीर दोघेही इच्छुक आहेत. दोघांच्या प्रबळ दावेदारीमुळे शिवसेनेचे प्रवेश थांबले आहेत. महिला प्रवर्गातून तिकीट मिळण्याचे ठोस आश्‍वासन मिळाल्याशिवाय अन्य लोक पक्षात येण्यास तयार नाहीत. उमेदवारी कोणाला मिळाली तरी खरी लढत शिवसेना व भाजपमध्येच होईल. युती झाल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना करावा लागेल. त्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेला फायदा होण्याची शक्‍यता आहे. भाजप व शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवारी जाहीर झाली तर दोन उमेदवार खानदेश भागातील, तर दोन स्थानिक उमेदवार देण्याचे नियोजन आहे.

Web Title: Strategy will be put at the center of Khandeshi voters