#MarathaKrantiMorcha बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

नाशिक - मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. नाशिक शहर परिसरामध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकल मराठातर्फे पंचवटी कारंजापासून मोर्चा काढून शालिमार चौकातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आले आणि परत पंचवटी कारंजा येथे घोषणाबाजी करून मोर्चाचा समारोप करण्यात आला. शालिमार, मेनरोड, पंचवटी, गंगापूर रोड या परिसरात दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवत बंदला प्रतिसाद दिला. दरम्यान, पोलिसांनी बंदच्या पार्श्‍वभूमीवर चोख नियोजन केल्यामुळे शहर परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. 

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुमारे 2 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणीही केली जात होती. तसेच, चौका-चौकात पोलीस तैनात होते. त्याचप्रमाणे शालिमार चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, रामकुंड, गाडगे महाराज पुल, कन्नमवार पुल, जुने नाशिक या परिसरात विशेष दक्षता घेण्यात आली होती. तसेच, पोलीस वाहनेही तैनात करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे, अनुचित प्रकार घडल्यास त्यास नियंत्रित करण्यासाठी शीघ्रकृती दल, राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह दंगाविरोधी वज्र वाहनही सज्ज ठेवण्यात आले होते. यावेळी उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त बापू बांगर, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सरकारवाड्याचे वरिषंठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक निलेश माईनकर हे मोर्चावर लक्ष ठेवून होते. 

लांब पल्ल्याच्या बसेसला पोलीस संरक्षण 
ठक्कर बाजार बसस्थानक येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या वाहनांना मार्गस्थ करण्यापूर्वी पोलीस बंदोबस्तात पुरविण्यात आला होता. शहराबाहेर बसेस पोहोच करून पोलीस वाहने परत येत होती. परिवहन महामंडळाच्या विनंतीनुसार शहर पोलिसांनी बंदोबस्त पुरविला. त्याचप्रमाणे, ग्रामीण हद्दीमध्ये ग्रामीण पोलीसांनी बंदोबस्त दिला होता. त्यामुळे काही बसेस या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस संरक्षणात मार्गस्थ झाल्या. तर काही बसेस या शिंदे टोल नाका येथे झालेल्या आंदोलनामुळे परत माघारी फिरविण्यात आल्या होत्या. 

शहर बसेस बंद ठेवण्याच्या सूचना 
पोलीस आयुक्तालयाने शहर बसेस आज (ता.25) बंद ठेवण्यासंदर्भातील सूचना परिवहन विभागाच्या नियंत्रकांना केल्या होत्या. आंदोलकांकडून शहर बसेसवर दगडफेक होण्याची शक्‍यता गृहीत धरून तशा सूचना केल्या होत्या. दुपारी वा सायंकाळी परिस्थिती नियंत्रणात असल्यास बसेस सुरू करण्यासंदर्भात पोलिंसांकडून कळविले जाणार होते. परंतु नुकसान व आंदोलकांचा उद्द्रेक टाळण्यासाठीच सदरचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले होते. 

अधिकारी सतत गस्तीवर 
सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, भद्रकाली, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांचे अधिकारी व गस्तीवरील कर्मचारी सातत्याने संवेदनशिल परिसरात गस्तीवर होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी संवेदनशिल परिसरात जात व्यापाऱ्यांसह आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले जात होते.

Web Title: Strict police settlement in the city on the back of the bandh