लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

आरोपी प्रेमकुमार छोटेलाल राजपूत याने गल्लीमध्ये राहणाऱ्या 4 आणि 7 वर्षांच्या दोन्ही बहिणींना खेळविण्याचा बहाणा करून स्वत:च्या घरामध्ये बोलावून घ्यायचा आणि त्यांच्याशी लैंगिक चाळे त्यांच्यावर अत्याचार करीत होता.

नाशिक : खेळण्याचा बहाणा करून घरात बोलावून ÷चिमुकल्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने 4 वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रेमकुमार छोटेलाल राजपूत (55, रा. सोमवार बाजार, थोरात गल्ली, देवळाली कॅम्प) असे आरोपीचे नाव असून 6 जानेवारी 2017 रोजी सदरची घटना घडली होती. 

आरोपी प्रेमकुमार छोटेलाल राजपूत याने गल्लीमध्ये राहणाऱ्या 4 आणि 7 वर्षांच्या दोन्ही बहिणींना खेळविण्याचा बहाणा करून स्वत:च्या घरामध्ये बोलावून घ्यायचा आणि त्यांच्याशी लैंगिक चाळे त्यांच्यावर अत्याचार करीत होता. सदरची बाब तिच्या आईच्या लक्षात आली असता, त्याच्याविरोधात उपनगर पोलिसात लैंगिक छळ आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायधीश एस.टी. पांडे यांच्यासमोर खटला सुरू झाला. यामध्ये सरकारी पक्षातर्फे ऍड. योगेश कापसे यांनी पीडित मुलींसह त्यांची आई व अन्य असे 5 साक्षीदार तपासले. यात आरोपी दोषी आढळून आल्याने न्यायालयाने त्यास 4 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम पीडित मुलींच्या मातेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास उपनगर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक संध्या तेली यांनी केला होता. तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार के. के. गायकवाड, एम. के. माळोदे यांनी न्यायालयात पाठपुरावा केला.

Web Title: Strict Punishment for the accused on sexual assault