‘मनपा’ तपासणार विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे

Book-Weight
Book-Weight

जळगाव - शहरातील बहुतांश शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे त्यांच्या वयानुसार अधिक असल्याने विद्यार्थ्यांना शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत महापालिकेकडून शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजनमाप करून त्यांच्या पाठीवर असलेले ओझे कमी करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. या शाळांमध्ये महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे हे अचानक भेटी देणार आहेत.

दिवसेंदिवस लहान मुलांच्या पाठीवर मोठ्या प्रमाणात दप्तराचे ओझे वाढत असून, विद्यार्थ्यांना विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पावले उचलण्यात येणार आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येणार आहे.

यामध्ये महापालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि शहरातील खासगी शाळांचा समावेश असणार आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे तपासून ओझे कमी करण्याबाबत उपाययोजना व सूचना शाळा प्रशासनाला दिल्या जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त मुठे यांनी दिली. 

पोषण आहार तपासणार
महापालिकेच्या बालवाड्यांमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची देखील तपासणी केली जाणार आहे. पोषण आहार लहान मुलांना व्यवस्थित मिळतो का नाही, यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहे. तसेच पोषण आहार पुरविणाऱ्या बचत गटांना अन्न व औषध प्रशासनाचा दाखला घ्यावा लागणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com