विद्यार्थ्याने साजरा केला अनोखा वाढदिवस

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 23 एप्रिल 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : जैताणे (ता. साक्री) येथील रहिवासी व आदर्श विद्या मंदिराचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आशुतोष भगवान जगदाळे याने जमविलेल्या आपल्या खाऊच्या पैशांतून येथील जवाहरलाल सार्वजनिक वाचनालयास 'फुले समग्र वाङमय' हा ग्रंथ भेट दिला. तर त्याचा सोळावा वाढदिवस असल्याने सोळा रोपेही भेट दिली. 'वाचनसंस्कृतीची जोपासना' व 'झाडे लावा, झाडे जगवा' असा पर्यावरण रक्षणाचा मंत्र त्याने या उपक्रमातून दिला.

वाचनालयातर्फे वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह यांनी 'फुले समग्र वाङमय' हा ग्रंथ आशुतोषकडून स्वीकारला. सचिव नितीनकुमार शाह, संचालक संजय शाह, शैलेश शाह, राजेश शाह, कर्मचारी प्रतीक शाह, अरुण अहिरे, प्राथमिक शिक्षक भगवान वाडेकर, प्रमोद बागुल, वाचक विजय मोरे, भटु गवळी आदींनी आशुतोष जगदाळे व अनुराग जगदाळे बंधूंच्या हस्ते रामफळ, बदाम, जांभूळ आदींची १६ रोपे स्वीकारली. जवाहरलाल वाचनालय व आदर्श विद्या मंदिराच्या परिसरात ह्या सोळा रोपांची लागवड केली जाणार आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून 'फुले समग्र वाङमय' हा ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती वाचनालयाच्या संचालक मंडळातर्फे देण्यात आली. संचालक राजेश शाह, प्राथमिक शिक्षक भगवान वाडेकर, प्रा. भगवान जगदाळे, आशुतोष जगदाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. केक कापून व पार्टी देऊन वाढदिवस साजरा करण्यापेक्षा विधायक, समाजोपयोगी उपक्रम राबवून तो साजरा व्हावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. संचालक मंडळातर्फे आशुतोषला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. वाचनालयात विधायक उपक्रम घेतल्याबद्दल त्याचे आभारही मानण्यात आले.

Web Title: Student celebrates special birthday in school