अपेक्षित गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

नाशिक - फुलेनगर (पंचवटी) येथे राहणाऱ्या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. साक्षी एकनाथ बेंडकुळे (वय 16) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. साक्षी ही पंचवटीतील स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी असून, तिने गेल्या मार्चमध्ये दहावीची परीक्षा दिली होती. आज निकाल जाहीर झाला, तेव्हा ती 56 टक्के गुण मिळवून उत्तीर्णही झाली. वडील एकनाथ बेंडकुळे यांनी, तिने प्रतिकुल परिस्थितीत अभ्यास करून उत्तीर्ण होण्यातच समाधानही व्यक्त केले होते. परंतु, साक्षी कमी गुण मिळाल्याने नाराज होती.

नाशिक - फुलेनगर (पंचवटी) येथे राहणाऱ्या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. साक्षी एकनाथ बेंडकुळे (वय 16) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. साक्षी ही पंचवटीतील स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी असून, तिने गेल्या मार्चमध्ये दहावीची परीक्षा दिली होती. आज निकाल जाहीर झाला, तेव्हा ती 56 टक्के गुण मिळवून उत्तीर्णही झाली. वडील एकनाथ बेंडकुळे यांनी, तिने प्रतिकुल परिस्थितीत अभ्यास करून उत्तीर्ण होण्यातच समाधानही व्यक्त केले होते. परंतु, साक्षी कमी गुण मिळाल्याने नाराज होती. या नाराजीतूनच तिने दुपारी पावणे तीनच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Web Title: Student suicide due to Not getting the expected mark